न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना रविवारी (2 एप्रिल) खेळला गेला. उभय संघांतील या सामन सुरुवातीला तर बरोबरीवर सुटला होता. पण पंचांनी सुपर ओव्हर खेळवल्याने श्रीलंकन संघ विजयी झाला. श्रीलंकन संघाने मागच्या 17 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये टी-20 विजय मिळवला आहे.
श्रीलंका संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तीन सामन्यांची टी-20 मालिका रविवारी (2 एप्रिल) सुरू झाली. मालिकेतील पहिलाच सामन्यात चाहत्यांना दोन्ही संघात जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5बाद 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने देखील 8 बाद 196 धावाच केल्या. त्यानंतर दोन्ही संघ सुपर ओव्हरमध्ये आमने सामने आले. पहिल्यांदाच न्यूझीलंडने फलंदाजी केली आणि सुपर ओव्हरमध्ये 2 बाद 8 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघाने मात्र एकही विकेट न गमावता 12 विकेट्स घेतल्या.
उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकेचे सलामीवीर मथूम निसांका आणि कुसल मेंडिस संघाला अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाही. दोघांनी अनुक्रमे 0 आणि 25 धावांवर विकेट गमावली. पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कुसल परेरा याने नाबाद 53 धावा कुटल्या. तसेच मध्यक्रमातील चरिथ असलंकाने 67 धावांची महत्वाची खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडसाठी डॅरिल मिचेल याने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. श्रीलंकन संघाला मागच्या 17 वर्षींमध्ये न्यूझीलंडमध्ये मिळालेला हा पहिला टी-20 विजय ठरला.
यापूर्वी 22 डिसेंबर 2006 रोजी न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेने टी-20 विजय मिळवला होता. 2006 साली श्रीलंकन संघाने अवघ्या 62 धावा करून हा सामना नावावर केला होता, ज्यामध्ये 51 धावा एकट्या सनथ जयसूर्याच्या होत्या. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या. पण पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि पंचांकडून श्रीलंकेला विजयासाठी अवघ्या 45 धावांचे लक्ष्य मिळाले. पण त्याआधीच श्रीलंकन संघ 5.5 षटकात एक बाद 62 धावा करून बसला होता.
(Exciting end to New Zealand vs Sri Lanka 1st T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीला धूळ चारल्यानंतर राहुल आपल्या खेळाडूंवर भलताच खुश! काय म्हणाला पाहाच
मार्क इधर है! पाच वर्षानंतर आयपीएल खेळायला उतरलेल्या ‘वेगवान’ वूडने मोडला 11 वर्षांपूर्वीचा विक्रम