मे महिन्यापासून आयसीसी विश्वचषक 2019 या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे सामने इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवले जाणार आहे.
यासाठी भारतीय संघात रिषभ पंत असणार आहे, असे संघनिवड अधिकारी एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भारताकडे विश्वचषकसाठी एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक हे देखील यष्टीरक्षणासाठी पर्याय असणार आहेत.
मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मते धोनी, कार्तिक संघात असल्याने पंतला संघात स्थान मिळणे अवघड आहे. त्यापेक्षा तो संघात नसलेलाच बरा आहे
धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन-डे सामन्यात सलग तीन अर्धशतके केली असून कार्तिकनेही संघाला गरज असेल तेव्हा उत्तम कामगिरी केली आहे.
“धोनीची सध्याची कामगिरी बघता पंतला संघात जागा मिळणे कठीण आहे. पंतने जरी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी त्याला मर्यादित षटकासाठीच्या क्रिकेटमध्ये फार कमी संधी मिळाली आहे”, असे गंभीरने स्पोर्ट्सकिडाशी बोलताना सांगितले आहे.
पंतने भारताकडून 3 वन-डे सामने खेळताना 41 धावा केल्या आहेत. तर 10 टी20 सामन्यात 157 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 9 कसोटी सामन्यात त्याने 696 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–NZvsIND: टी२० मालिकेबरोबरच शेवटचे दोन वनडेही खेळणार नाही विराट कोहली, जाणून घ्या कारण
–भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत हा प्रतिभावान खेळाडू १०० टक्के करणार पदार्पण
–Video: धोनी-कोहलीची ही नवीकोरी गाडी पाहिली का?