येत्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर (West Indies Tour Of India) येणार आहे. यौ दौऱ्यावर उभय संघांना ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी नुकतीच (२६ जानेवारी) भारताच्या १८ सदस्यीय संघांची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याला जागा दिली गेलेली नाही. आता त्याची निवड न होण्यामागचे कारण पुढे (Reason Behind Ashwin Not Selected) आले आहे.
मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाकडून तिन्ही वनडे सामने खेळलेल्या अश्विनला वेस्ट इंडिजविरुद्ध संधी न मिळण्यामागचे प्रमुख कारण त्याला झालेली दुखापत (R Ashwin Injury) असल्याचे समजत आहे.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका खेळताना अश्विनच्या मनगट आणि पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून बरे व्हायला त्याला वेळ लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये अश्विनच्या पायाचा घोटा वाकडा झाला आणि तो मनगटावर पडला, यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कदाचित वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची निवड झाली नसावी. तसेच त्याने वनडे मालिकेत फारसा प्रभाव पाडला नव्हता, हेही कारण असावे.
याबरोबरच दुखापत असतानाही अश्विनला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवणे, योग्य ठरणार नाही. यामुळे निवडकर्त्यांनी त्याला विश्रांती देण्याच्या निर्णयास प्राधान्य दिले आहे.
अश्विनची कमतरता भरून काढण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध फिरकीपटू कुलदीप यादवला वनडे संघात जागा दिली गेली आहे. तर रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल हे वनडे आणि टी२० संघाचा भाग आहेत.
भारताचा वनडे संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर , युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसीद्ध कृष्णा, आवेश खान
भारताचा टी२० संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर लीगच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडची धडक, बघा भारत आणि पाकिस्तान कधी खेळणार क्वार्टर फायनल?
प्रो कबड्डी: ‘पुणेरी पलटण’पुढे ‘यूपी योद्धा’ नतमस्तक, ६ गुणांच्या फरकाने गमावला सामना
हेही पाहा-