इंग्लंडच्या जो रुटनं रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावलं. यासह त्याने कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. या चार क्रिकेटपटूंचा मॉडर्न ‘फॅब फोर’मध्ये समावेश आहे.
33 वर्षीय रुटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 120 धावा केल्या. या खेळीसह जो रुटने सर्वाधिक कसोटी धावांच्या बाबतीत दिग्गज शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकलं. आता त्याचं पुढील टार्गेट ब्रायन लारा आहे. लाराला मागे टाकण्यासाठी जो रुटला केवळ 14 धावांची आवश्यकता आहे. जो रुटच्या नावावर 142 कसोटी सामन्यांमध्ये 11,940 धावा आहेत. लाराच्या नावावर 131 कसोटीत 11,953 धावा आहेत.
जर आपण आधुनिक फॅब फोरबद्दल बोललो, तर जो रुट इतर तीन फलंदाजांपेक्षा खूपच पुढे गेला आहे. रुट हा फॅब फोरमधील एकमेव फलंदाज आहे, ज्यानं 10 हजारांहून अधिक कसोटी धावा केल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 109 कसोटी सामन्यात 9685 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 113 कसोटीत 8848 धावा आहेत. न्यूझीलंडचा केन विल्यमसन चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं 100 कसोटी सामन्यांमध्ये 8743 धावा केल्या आहेत.
आता विराट, स्मिथ आणि विल्यमसन यांचं पहिले लक्ष्य 10 हजार धावा पूर्ण करण्याचं असेल. त्याचवेळी जो रुट आता कुमार संगकारा (12400 धावा), ॲलिस्टर कुक (12472 धावा) आणि राहुल द्रविड (13288 धावा) यांना मागे टाकण्याचा विचार करेल. सध्या रुट ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो या वर्षी संगकारा आणि कुकला मागे टाकू शकतो. राहुल द्रविडचा विक्रमही रुटच्या निशाण्यावर आहे, मात्र यासाठी त्याला पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय संघाचं नुकसान? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल
सचिन तेंडुलकरचा शतकांचा रेकॉर्ड धोक्यात? इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा जो रुटबाबत मोठा दावा
रवींद्र जडेजाला संघातून वगळलं का? आगरकर म्हणाले, “त्याला निवडण्यात काही अर्थ…”