बुधवारी (२२ एप्रिल )आयपीएल २०२१ स्पर्धेत डबल हेडर सामने पार पडले. यातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या संघामध्ये पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने विजयाच्या प्रतिक्षेला पूर्णविराम लावत ९ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधाराला बाद केल्यानंतर फेबियन एलन याने आगळा वेगळा डान्स करत जल्लोष साजरा केल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १२० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने १९ व्या षटकात हा सामना जिंकला. या संघाला डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु अकराव्या षटकात केएल राहुलने फेबियन एलनला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले होते.
या षटकातील पहिल्याच चेंडूवर डेविड वॉर्नरने मिड विकेटच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला आणि तो झेलबाद झाला होता. याचाच जल्लोष म्हणून फेबियनने आगळा वेगळा डान्स करायला सुरुवात केली होती. या डान्सची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
— Cricsphere (@Cricsphere) April 21, 2021
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय फसला. कारण संघातील मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. या संघाकडून मयंक अगरवाल याने २२ धावा केल्या तर शाहरुख खानने देखील २२ धावा केल्या होत्या. याव्यिरिक्त कोणाला ही लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यश आले नाही. पंजाब संघाने १९.४ षटकात सर्वबाद १२० धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाकडून आलेले सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने ३७ धावा केल्या तर बेअरस्टोने नाबाद ६३ धावांची खेळी केली होती. यासोबतच आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेल्या विलियमसनने नाबाद १६ धावा केल्या. याच जोरावर हैदराबाद संघाने पंजाबचे आव्हान १८.४ षटकात पूर्ण केले आणि या हंगामातील पहिला विजय साकारला.
महत्वाच्या बातम्या:
रोहित-धोनीनंतर आता मॉर्गनवर देखील होणार कारवाई, हे आहे कारण
पॅट कमिन्सने सॅम करनला एकाच षटकात ठोकल्या ३० धावा, गेल-रैना-कोहली यांच्या पंक्तीत मिळवले स्थान
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडू आघाडीवर, पाहा कोणाचा आहे टॉप ५ मध्ये समावेश