भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार शतकी खेळीमुळे सामन्यात आघाडी मिळवली आहे. अजिंक्यने सुरुवातीला आपल्या नेतृत्व गुणांनी सर्वांना प्रभावित केले व त्यानंतर आपल्या फलंदाजीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहे. मात्र याच दरम्यान अजिंक्यच्या खेळ भावनेने संपूर्ण क्रिकेटविश्वात त्याचा आदर आणखीनच वाढला आहे.
तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाने आपल्या फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा अजिंक्य व जडेजा दोघेही उत्तम फॉर्ममध्ये दिसत होते. मात्र याच दरम्यान नॅथन लायनने गोलंदाजी केलेल्या १०० व्या षटकात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला व त्यामुळे अजिंक्य धावबाद झाला.
अजिंक्य ११२ धावांवर धावबाद झाल्यानंतर जडेजाच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात निराशेचा भाव दिसत होता. मात्र पवेलियनमध्ये जाताना अजिंक्यने त्याला प्रोत्साहन दिले. अजिंक्यच्या या कृतीचे संपूर्ण क्रिकेटविश्वात कौतुक होत असून सर्वांनी अजिंक्यने दाखवलेल्या खेळ भावनेचे कौतुक केले जात आहे.
Fabulous gesture by Rahane, patting Jadeja despite getting run-out, more like go on Jaddu, carry on what you've been doing well so far. What a selfless guy!!#AUSvIND pic.twitter.com/VotuKRfYyT
— ⚡Ashwin⚡ (@ak10_amelia) December 28, 2020
https://twitter.com/bhargav_prdip/status/1343349405311627264
दरम्यान सामन्याचा विचार केला असता भारतीय संघाने अजिंक्यच्या शानदार 112 धावांच्या खेळीमुळे दमदार आघाडी मिळवली आहे. अजिंक्य धावबाद झाल्यानंतर काही वेळातच जडेजा देखील 57 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला पुनरागमनाची संधी मिळाली आहे. त्यांनी याचा फायदा घेत भारतीय संघाला पहिल्या डावात 326 धावांवर सर्वबाद केले. पण भारताने 131 धावांची आघाडी मिळवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…. तर क्रिकेट विश्वासाठी ‘हे’ खूप भितीदायक ठरेल, विराटबद्दल बोलताना पाँटिंगचे भाष्य
ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं! ‘हा’ मोठा खेळा़डू तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता
पावसाने केली मैदानातील कर्मचाऱ्यांची दमछाक; मजेशीर व्हिडिओ झाला व्हायरल