मुंबई | भारतीय क्रिकेट बोर्डाच्या द्विपक्षिय मालिकांसाठीच्या डिजीटल प्रक्षेपणासाठी कोण किती पैसे मोजणार हे लवकरच समजणार आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि सर्च इंजिन गूगल यांच्याबरोबर मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायंस जियो इंफोकॉम आणि हॉटस्टार हे या लिलावात भाग घेणार आहेत.
हा लिलाव एप्रिल २०१८ ते मार्च २०२३ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. यात डिजिटल राइट्स पहिल्या वर्षासाठी प्रती सामना कमीतकमी ८ कोटी तर नंतरच्या ४ वर्षांसाठी ७ कोटी असे असणार आहेत.
टेलिविजन राइट्सची बेस प्राइज पहिल्या वर्षासाठी प्रती सामना कमीतकमी ३५ कोटी तर नंतरच्या ४ वर्षांसाठी ३३ कोटी अशी असणार आहे.
हा लिलाव ई-ऑक्शन पद्धतीने होणार आहे. परंतु २७ मार्च ते ३ एप्रिल या काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. कारण ज्यांनी या लिलावात भाग घेतला आहे त्यांना आवश्यक बाबींची पुर्तता करता यावी. यासाठी टेंडर प्रक्रिया २० फ्रेब्रुवारी रोजी सुरू झाली होती.
या स्पर्धेत फेसबुक, जिओ टीव्ही, गुगल, स्टार, यप टीव्ही आणि सोनी ह्या सहा दिग्गज कंपण्या भाग घेणार आहे.