मेलबर्न। आज महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव केला आणि 5 व्यांदा टी20 विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीने तुफानी अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. तिने 39 चेंडूत 75 धावा केल्या. तिच्या या कामगिरीमुळे तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला.
अशा या ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज असणाऱ्या एलिसा हेलीबद्दल थोडक्यात माहिती…
– ऑस्ट्रेलियाची स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीचा जन्म 24 मार्च 1990ला झाला. तिचा जन्म खेळाशी खासकरून क्रिकेटशी संबंधित असणाऱ्या कुटुंबात झाला. तिचे वडील ग्रेग हिली क्वीन्सलॅंडकडून खेळायचे तर काका इयान हिली ऑस्ट्रेलिया संघात यष्टीरक्षक फलंदाज होते.
-एलिसा हिली स्थानिक क्रिकेटमध्ये न्यू साऊथ वेल्स कडून खेळते. न्यू साऊथ वेल्सकडून 2007मध्ये तिने खेळायला सुरूवात केली.
– 2010च्या महिला टी20 विश्वचषकासाठी तिची निवड झाली होती. मागलीवर्षी श्रीलंकेविरूद्ध टी20 सामन्यात सिडनी येथे तिने 148 धावा करत टी20 कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तीक धावा केला. तर वनडेमध्ये तिच्या सर्वोच्च वैयक्तीक धावसंख्या 133 अशी आहे. या धावा तिने बडोदा येथे मार्च २०१८मध्ये भारताविरूद्ध खेळताना केल्या होत्या.
-एप्रिल 2015 मध्ये तिने ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्कशी लग्न केले.
-डिसेंबर 2018मध्ये अलिसा हिलीला आयसीसी तर्फे T20 प्लेयर ऑफ द ईयर हा अवॉर्ड मिळाला.
-2018 ला झालेल्या टी20 महिला विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार तिला मिळाला होता.





