---Advertisement---

तेव्हा षटकार मारला म्हणून केली होती डोप टेस्ट, आज खेळतीये विश्वचषकाच्या फायनलमध्ये

On: शनिवार, मार्च 7, 2020 6:22 PM
---Advertisement---

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदाच महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे ती आज वाढदिवसाच्या दिवशीच भारताचे अंतिम सामन्यात नेतृत्व करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी आयसीसीच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात नेतृत्व करणारी ती पहिलीच कर्णधार आहे.

हरमनप्रीतबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी- 

-हरमनप्रीत कौरचा जन्म८ मार्च १९८९ रोजी झाला आहे. तीचे सध्याचे वय ३१ वर्ष आहे.

-तिला २०१७ साली मानाचा असा अर्जून पुरस्कार भारत सरकारकडून देण्यात आला आहे.

-भारताकडून टी२०विश्वचषकामध्ये शतकी खेळी करणारी ती एकमेव खेळाडू आहे. २०१८ टी२० विश्वचषकात तिने न्यूझीलंडविरुद्ध ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली होती.

-तिचे वडील सतविंदर सिंग हे वाॅलीबाॅल व बास्केटबाॅल खेळाचे खेळाडू राहिले आहेत.

-७मार्च २००९ रोजी तीने वयाच्या २०व्या वर्षी महिला विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तिच्या कारकिर्दीला कालच ११ वर्ष पुर्ण झाली आहेत.

-२००९मध्ये तीने टी२० विश्वचषकातून आपले टी२० पदार्पण केले होते. तीन वनडे व टी२० पदार्पण हे विश्वचषकातून केले हे विशेष.

-हरमनप्रीत कौर विरेंद्र सेहवागला आपला फलंदाजीतील आदर्श मानते. तीने २०१७ विश्वचषकानंतर सेहवागची भेट घेतली होती.

-२०१२मध्ये प्रथमच तीला भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ती भारतीय टी२० संघाची गेले काही वर्ष कर्णधार राहिली आहे.

-परदेशात क्रिकेटमध्ये लीगला करारबद्ध होणारी हरमनप्रीत कौर ही पहिली महिला क्रिकेट ठरली होती. तीने २०१६मध्ये बीग बॅश लीगमधील सिडनी थंडरकडून सामने खेळले होते.

-क्रिकेट खेळल्यावर केस धुण्यासाठी त्रास होतो म्हणून तीने आपले केस कापले होते. त्यानंतर तीचे वडिल जवळपास १ महिना हरमनप्रीतशी बोलत नव्हते.

-२००९मध्ये क्रिकेट विश्वचषकात जोरदार षटकार मारल्यामुळे हरमनप्रीतच्या बॅटची लॅबोरटरीमध्ये चाचणी घेण्यात आली होती. एवढेच नाही तर तिची डोपिंग टेस्टही करण्यात आली होती.

-हरमनप्रीत कौरचे वडील सतविंदर सिंग हे पण एक खेळाडू होते. वयाच्या 20व्या वर्षी हरमनप्रीतने क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिला गुड बॅटिंग असे चित्र असलेला टीशर्ट घातला होता. त्या चित्रात ‘फलंदाज फटका मारतानाचे’ दृश्य होते. हरमनप्रीतच्या कुटूंबाला सुद्धा असे वाटते की, ती आत्ता जे काही आहे त्यात या टीशर्टचे पण काही योगदान आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---