दक्षिण आफ्रिका संघाचे धडाकेबाज फलंदाज फाफ डू प्लेसिस, डेविड मिलर आणि वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलसह पाच परदेशी खेळाडूंनी लंका प्रीमियर लीगमधून माघार घेतली आहे. या खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे फ्रँचायझी मालकांना चांगलाच फटका बसला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेमुळे डू प्लेसिस, मिलर आणि इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान हे फलंदाज एलपीएलमध्ये खेळणार नाहीत.
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रसेल आपल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
यासोबतच भारतीय यष्टीरक्षक मानविंदर बिस्ला एलपीएल स्पर्धेतून माघार घेणारा पाचवा परदेशी खेळाडू आहे. बिस्लाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये ३५ सामने खेळले आहेत.
एलपीएल या लीगमध्ये रसेल, मिलर, डू प्लेसिस आणि मलानला मार्की खेळाडू म्हणून निवडले होते. त्यांच्या न खेळण्यामुळे स्पर्धेला चांगलाच झटका बसला आहे.
एलपीएलमधील कोलंबो किंग्स फ्रँचायझी संघाला मोठा फटका बसला आहे. कारण त्यांच्या संघात रसेल, डू प्लेसिस आणि बिस्ला या खेळाडूंचा समावेश होता, तर मलान जाफना स्टॅलियन्स या संघाकडून खेळणार होता.
श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीगचे आयोजन २१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर यादरम्यान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-काय सांगता! एबी डिविलियर्सची ‘या’ प्रसिद्ध टी२० लीगमधून माघार
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोघांवर झाला अन्याय तर ‘या’ दोन शिलेदारांना लागली लॉटरी
-IPL 2020: आज दिल्लीची कसोटी, हैदराबादला चितपट करत ठरणार प्लेऑफमध्ये स्थान मिळणारा पहिला संघ
-भल्याभल्या क्रिकेटरला घाम फोडणारा गोलंदाज संपुर्ण कारकिर्दीत होता डिप्रेशनमध्ये
ट्रेंडिंग लख-
-वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!
-अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…