---Advertisement---

अर्धशतक एक विक्रम अनेक! फाफने विराट-डिविलियर्सलाही सोडले मागे

Faf du Plessis Glenn Maxwell
---Advertisement---

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये फाफ डू प्लेसिस जबसदस्त सातत्य दाखवताना दिसला आहे. त्याने हंगामातील प्रत्येक सामन्यात आपल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली आहे. रविवारी (14 मे) फाफने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुन्हा एकदा आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. याचसोबत हंगामातील आपल्या 600, आणि एकंदरीत आयपीएलमधील 4000 धावा पूर्ण केल्या आहेत.

आयपीएल इतिहासातील फाफ डू प्लेसिस 15वा खेळाडू आहे, ज्याने या लीगमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला आहे. सर्वात कमी डावांमध्ये 4000 आयपीएल धावा करणाऱ्यांचा विचार केला, तर फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादीत पहिला क्रमांक केएल राहुल (KL Rahul) यायचा आहे, ज्याने 105 डावांमध्ये 4000 आयपीएल धावा पूर्ण केल्या होत्या. दुसर्या क्रमांकावरील ख्रिस गेल याने 112 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियन दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने 114 डोवांमध्ये अशी कामगिरी केली होती. यादीत चौथ्या क्रमांकावर फाफ डू प्लेसिस याचे नाव जोडले गेले आहे. फाफने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराटने 128, तर फाफने अवघ्या 121 डावांमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत.

सर्वात कमी डावांमध्ये 4000 आयपीएल धावा करणारे खेळाडू
105 – केएल राहुल
112 – ख्रिस गेल
114 – डेविड वॉर्नर
121 – फाफ डू प्लेसिस*
128 – विराट कोहली
131 – एबी डिविलियर्स

दरम्यान, उभय राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील या सामन्यात नाणेफेक फाफने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. माजी कर्णधार विराट कोहली 19 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. पण कर्धणार यावेळीली संघासाठी महत्वपूर्ण धावा करत होता. फाफने 41 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने एकूण 44 चेंडू खेळले आणि 55 धावा करून विकेट गमावली. फाफ आयपीएलमध्ये 4000 धावा करणारा चौथा विदेशी खेळाडू ठरला आहे. त्यातही दक्षिण आफ्रिकेच्याच दोघांनी ही कामगिरी केली आहे. एबी डिविलियर्सनंतर फाफ यादीतील दुसरा आफ्रिकी फलंदाज आहे, जो 4000 आयपीएल धावा करू शकला. चालू आयपीएल हंगामातील आपले 7वे शतक फाफने रविवारी ठोकले. (Faf Du Plessis becomes the 4th overseas player to score 4,000 runs in the IPL.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा जिंकताच विराटची राहुल गांधींसाठी खास पोस्ट? सर्वत्र रंगली एकच चर्चा
प्ले-ऑफच्या शर्यतीसाठी राजस्थान अन् बेंगलोर आमने-सामने; संजूच्या बालेकिल्ल्यात फाफसेना करणार बॅटिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---