आयपीएल यशस्वी नियोजनानंतर जगभरात फ्रँजायझी क्रिकेटचे पेव वाढले. मग त्यामध्ये बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग अशा विविध स्पर्धांना सुरुवात झाली. खेळाडूंना कमी वेळात प्रचंड पैसा मिळायला लागला. खेळाडूदेखील त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये आपल्या जीवाचे रान करताना दिसून येतात.
काही दिवसांपुर्वी युएईत चालू असलेल्या पीएसएल सामन्यादरम्यान चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात फाफ डू प्लेसिसला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. डोक्याला मार लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा धुरंधर फलंदाज फाफ डु प्लेसिसने एक विधान केले आहे. तो आता व्यवस्थित आहे आणि लवकरच बरा होऊन मैदानात उतरेल असे त्याने सांगितले.
क्येटा ग्लॅडीयेटर संघासाठी क्षेत्ररक्षण करीत असताना त्याची आपल्याच संघाचा मोहम्मद हसनेनसोबत टक्कर झाली. त्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे त्याची स्मृती गेली होती. फाफ डु प्लेसिसने एक ट्विट पोस्ट करीत सांगितले की, ‘तुम्हा सर्वांच्या प्राथर्ना आणि पाठिंब्याकरीता धन्यवाद. मी हॉटेलमध्ये परत आलो असून तंदुरुस्त होत आहे. मला काही काळासाठी स्मृतिभ्रंश (मेमरी लॉस) झाला होता. परंतु आता मी ठीक आहे. अपेक्षा आहे की लवकरच मैदानात पुनरागमन करेन.’
Thank you everyone for all the messages of support. I'm back at the hotel recovering. Have concussion with some memory loss but I will be fine. Hopefully be back on the field soon. Much love. ❤️
— Faf Du Plessis (@faf1307) June 13, 2021
अशी झाली होती दुखापत
घडले असे की, पेशावर जाल्मी संघाविरुद्ध क्षेत्ररक्षण करीत असताना चेंडु रोखायच्या प्रयत्नात फाफची मोहम्मद हसननेसोबत टक्कर झाली होती. आणि त्यातच डोक्याला मार लागल्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले. पहिल्याच डावात झालेल्या या घटनेमुळे त्याने या सामन्यात पुढे भाग घेतला नाही. सातव्या षटकातच ही घटना घडली होती.
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळताना फाफ जबरदस्त प्रदर्शन करीत होता. आयपीएलच्या 7 सामन्यांत त्याने 320 धावा केल्या आहेत. पीएसएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर चेन्नई सुपरकिंग्सने देखील ट्विट करीत त्याला लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
पाकिस्तान सुपर लीग यावर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर अनेक विचारविनिमय केल्यावर 9 जूनपासून पुन्हा उर्वरित हंगाम सुरू करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सॅम करनच्या भावाचा अविश्वसनीय झेल, हवेत सूर मारत एका हाताने पकडला अवघड चेंडू
भारताच्या पराभवाचा दावा करणाऱ्या वॉनला जाफरने चांगलेच फटकारले; म्हणाले, ‘चल.. तू निघ’
RRच्या ‘या’ शिलेदाराचे धोनीसोबत आहे बालपणीपासूनचे नाते, वडीलही माहीचे होते सहकारी