रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा 12वा सामना आणि आयपीएल 2023 स्पर्धेतील 60वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअम येथे रविवारी (दि. 14 मे) खेळला जात आहे. या सामन्यात बेंगलोरपुढे राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान आहे. या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने एक जबरदस्त कारनामा रचला. तो अशी कामगिरी करणारा हंगामातील पहिलाच खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त त्याने आणखी काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
झाले असे की, राजस्थान विरुद्ध बेंगलोर संघातील सामन्यापूर्वी फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने नाणेफेक जिंकली. तसेच, फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी बेंगलोरकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार फाफसोबत विराट कोहली मैदानावर उतरला. यावेळी फाफने 24 धावांचा टप्पा पार करताच करताच त्याने खास विक्रम रचला.
फाफ डू प्लेसिसचा विक्रम
फाफने यावेळी सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत 24 धावांचा टप्पा पार करताच त्याने आयपीएल 2023मध्ये 600 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. या धावा करण्यापूर्वी त्याने 11 सामने खेळताना 576 धावा केल्या होत्या. यामध्ये 6 अर्धशतकांचाही समावेश होता. यासह त्याने आयपीएल कारकीर्दीतील 4000 धावाही पूर्ण केल्या.
बेंगलोरकडून आयपीएलच्या एका हंगामात 600 धावा करणारा खेळाडू
विशेष म्हणजे, फाफ हा आयपीएलमध्ये एका हंगामात 600 धावा करणारा बेंगलोरचा सातवा खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी 2011मध्ये ख्रिस गेल, 2012मध्ये ख्रिस गेल आणि 2013मध्येही गेलने आणि विराट कोहली यांनी बेंगलोरसाठी 600 धावांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर 2016च्या हंगामात विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी बेंगलोरकडून 600 धावा केल्या होत्या. यानंतर आता 2023मध्ये फाफ डू प्लेलिस याच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला. (Faf du Plessis has completed 600 runs in IPL 2023 against rajasthan royals)
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात बेंगलोरसाठी 600 धावा करणारे खेळाडू
2011 – ख्रिस गेल
2012 – ख्रिस गेल
2013 – ख्रिस गेल/ विराट कोहली
2016 – विराट कोहली/एबी डिविलियर्स
2023 – फाफ डू प्लेसिस*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा जिंकताच विराटची राहुल गांधींसाठी खास पोस्ट? सर्वत्र रंगली एकच चर्चा
मोठी बातमी! लाईव्ह सामन्यात लखनऊच्या कोचकडून लज्जास्पद कृत्य, काय केलंय तुम्हीच पाहा






