---Advertisement---

तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर फाफ डू प्लेसिस उतरणार पुन्हा मैदानात; ‘या’ संघाचे करणार नेतृत्व

On: शनिवार, ऑगस्ट 28, 2021 3:41 AM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) एका सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तब्बल तीन महिन्यांच्या अवधीनंतर फॅफ डु प्लेसिस पुन्हा मैदानात उतरणार आहे.

पीएसएलच्या एका सामन्यात डु प्लेसिस गंभीर जखमी झाला होता. या दुखापतीतून सावरण्यासाठी डू प्लेसिसला बराच वेळ द्यावा लागला. डू प्लेसिस इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत देखील सहभाग नोंदवणार होता. मात्र खराब तंदुरुस्तीमुळे त्याला तेथे सहभाग नोंदवता आला नाही. मात्र, आता डु प्लेसिस लवकरच गुरुवार (२६ ऑगस्ट) पासून सुरु होणाऱ्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये खेळताना दिसणार आहे.

या स्पर्धेत प्लेसिस सेंट लुसिया किंग्स या संघाचे कर्णधारपद देखील भूषवणार आहे. सीपीएलमधील संघ सेंट लुसिया किंग्स हा इंडियन प्रीमियर लीगमधील पंजाब किंग्स संघाच्याच मालकीचा सहभागी संघ आहे.

डु प्लेसिस संघाच्या जर्सी अनावरणाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाला, “वैयक्तिकरित्या मी क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा खेळण्यासाठी खूप आतुर आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा अवधी होता. मी तब्बल तीन महिने क्रिकेट खेळू शकलो नाही. त्यामुळे, पुन्हा मैदानात उतरण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तसेच मला ते काम करायचे आहे, जे करायला मला खूप आवडते. मला वाटले होते की, मी एका महिन्यात पूर्णपणे तंदुरुस्त होईल. मात्र मला पूर्णपणे तंदुरुस्त व्हायला ३ महिने वेळ द्यावा लागला.”

दरम्यान, पीएसएलमधील संघ ‘क्वेटा ग्लॅडिएटर्स’ संघाकडून खेळताना सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना एक चौकार रोखण्याच्या प्रयत्नात डु प्लेसिसची आपल्या संघ सहकार्‍यांसोबत धडक झाली होती. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे डू प्लेसिसला स्कॅनिंगसाठी मैदानातून बाहेर जावे लागले होते. ज्यानंतर त्याला डॉक्टरांनी आराम घेण्यास सांगितले होते. यामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. तसेच दुखापतीतून बरे होण्यासाठी देखील डु प्लेसिसला बऱ्याच महिन्यांचा अवधी लागला.

महत्त्वाच्या बातम्या –
गेलची तोडफोड फलंदाजी! गगनचुंबी षटकाराने तोडली खिडकीची काच, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘निवडीवर भाष्य करायला आवडणार नाही’, हेडिंग्ले कसोटीत अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावर शमीचे उत्तर
कोहलीचे स्केच दाखवणाऱ्या चाहत्याला पाहून, इंग्लिश प्रेक्षकांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, फोटो व्हायरल

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---