मोहाली। आज(5 मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात 55 वा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 170 धावा केल्या आहेत.
चेन्नईकडून डुप्लेसिसने 55 चेंडूत 96 धावांची खेळी केली. त्याने या सामन्यात 10 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र त्याचे आयपीएलमधील पहिले शतक केवळ 4 धावांनी हुकले. त्याला 20 वर्षीय सॅम करनने त्रिफळाचीत केले.
करनने या सामन्यातील 19 व्या षटकात गोलंदाजी करताना चौथा चेंडू यॉर्कर टाकला. या चेंडूवर फटका मारताना डुप्लेसिसचा तोल गेला त्यामुळे चेंडू डुप्लेसिसच्या पॅडला लागून स्टम्पला लागला आणि डुप्लेसिसला त्याची विकेट गमवावी लागली.
डुप्लेसिस हा या मोसमात 96 धावांवर बाद होणारा चेन्नईचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध शेन वॉटसन 96 धावांवर बाद झाला होता.
आज सुरु असलेल्या सामन्यात करनने चेन्नईला सुरुवातीलाच वॉटसनला 7 धावांवर त्रिफळाचीत करुन पहिला धक्का दिला होता. पण त्यानंतर डुप्लेसिस आणि सुरेश रैनाने दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी रचत चेन्नईच्या डावाला बळकटी दिली. पण करननेच रैनाला 53 धावांवर बाद करत ही जोडी तोडली.
त्यानंतर शेवटच्या षटकात अंबाती रायडू आणि केदार जाधवला मोहम्मद शमीने बाद केले. त्यामुळे चेन्नईला 170 धावांवर रोखण्यात पंजाबला यश आले.
A yorker – To Faf, With love, from Curran https://t.co/e2LK5jXhWW via @ipl
— gujjubhai (@gujjubhai17) May 5, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएस धोनीनंतर आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा विराट कोहली दुसरा कर्णधार
–मी आणि डिविलियर्स ‘राम-लखन’ आहोत – विराट कोहली
–राजस्थान विरुद्ध अर्धशतक करणाऱ्या रिषभ पंतने मोडला सेहवागचा हा मोठा विक्रम





