बंगळूरु। शनिवारी(4 मे) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात 54 वा सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने 4 विकेट्सने विजय मिळवला. तसेच त्यांचा या मोसमातील शेवटही गोड केला.
या विजयाबरोबरच हा सामना बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे. विराटने या सामन्यात 16 धावाच केल्या. पण त्याने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 4 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आयपीएलमध्ये हा टप्पा पार करणारा तो केवळ दुसरा कर्णधार ठरला आहे.
याआधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने हा पराक्रम केला आहे. धोनीनेही या आयपीएल मोसमातच कर्णधार म्हणून 4000 धावांचा टप्पा पार केला आहे.
विराट हा 2013 पासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा नियमित कर्णधार आहे. त्याने आत्तापर्यंत बेंगलोरचे 110 सामन्यात नेतृत्व केले आहे.
शनिवारी झालेल्या या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 175 धावा केल्या होत्या. हैद्राबादकडून कर्णधार केन विलियमसनने 43 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. तसेच बेंगलोरकडून वॉशिंगटन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 176 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोर संघाची 3 बाद 20 अशी अवस्था असताना गुरकिरत मन आणि शिमरॉन हेटमेयरने अर्धशतकी खेळी केल्या. गुरकिरतने 65 आणि हेटमेयरने 75 धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी रचली आणि बेंगलोरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
हैद्राबादकडून गोलंदाजीत खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–मी आणि डिविलियर्स ‘राम-लखन’ आहोत – विराट कोहली
–राजस्थान विरुद्ध अर्धशतक करणाऱ्या रिषभ पंतने मोडला सेहवागचा हा मोठा विक्रम
–विराट कोहली, डिविलियर्सने शेवटच्या सामन्याआधी मागितली चाहत्यांची माफी, पहा व्हिडिओ






