---Advertisement---

विराट कोहली सुपरमॅन आहे, दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूचे विराटबद्दल भावनिक वक्तव्य

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 1:03 AM
Faf Du Plessis And Ab De Villiers
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. एवढच नव्हे तर बरेच दिग्गज खेळाडू देखील त्याच्या व्यक्तीमत्वाचे चाहते आहेत. यापैकी एक नाव आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याचे देखील आहे. तो विराटबद्दल सविस्तर बोलला आणि त्याची बरीच प्रशंसा देखील केली. आयपीएल 2022मध्ये डु प्लेसिस याला रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे कर्णधारपद देण्यात आले आणि विराट कोहली याच्यासोबत खेळण्याचा अनुभवही मिळाला.

फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis)2022च्या आधी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. मात्र, नंतर त्याला 2022मध्ये आरसीबी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. यंदाच्या हंगामात देखील तो आरसीबी संघाचे नेतृत्व डु प्लेसिस याच्याकडे असणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) याने आरसीबी संघासाठी मोठे योगदान दिले आहे आणि त्याने बऱ्याच वेळा संघासाठी मोठे डाव खेळले आहेत. डु प्लेसिसने कोहलीला एका चांगल्या व्यक्तीच्या रुपात व्यक्त केले आहे आणि त्याला सुपरमॅनची उपाधीही दिली.

विराट खूप काळजी घेणारा व्यक्ती आहे-फाफ डु प्लेसिस
आपसीबीच्या कर्णधारानेे विराटबद्दल बोलताना म्हटला की,”जेव्हा तुम्ही विराट कोहलीसोबत खेळत असता तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होतात. तो खूप काळजी करणारा व्यक्ती आणि कुटुंबाला जास्त महत्व देतो. एक चांगला व्यक्ती म्हणून त्याचे सिद्धांत खूप चांगले आहेत. विश्वक्रिकेटमध्ये विराट एक आव्हान देणारा खेळाडू आहे. तो सुपरमॅन आहे. ”

आरसीबीनेे आगामी हंगामासाठी चांगलीच कंबर कसली आहे. संघानेे विराट कोहलीला रिटेन केलल्या खेळाडूंच्या यादीत सामील केले गेले आणि पुन्हा एकदा फाफ डु प्लेसिसवर विश्वास कायम ठेवला आहेे. आरसीबी संघाने अजूनपर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकला नाही. मात्र, हे बघण्यासारखे राहील की डु प्लेसिस संघाच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे की नाही. यापुर्वी त्यानेे चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी धमाकेदार प्रदर्शन केले होते.(Faf Du plessis praised Virat Kohli for his caring nature and told that he is superman)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंत ट्रोलर्सच्या निशाण्यावर, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यातही अपयशी
सूर्यावर चढला विराटचा फिव्हर, मैदानातच ‘ढम ढम बाजे ढोल’ गाण्यावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---