---Advertisement---

चपळ क्षेत्ररक्षण, ते हेच…! फाफचा सीमारेषेवर ‘फाडू’ झेल, केकेआरच्या कर्णधाराला धाडलं तंबूत

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 10:29 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी (२६ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार ऑयन मॉर्गनने अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी त्यांच्या क्षेत्ररक्षणामुळे खूप प्रभावित केले. अंबाती रायडू असो किंवा सुरेश रैना, सर्व क्षेत्ररक्षकांनी केकेआरविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली.

यादरम्यान, दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसने एक अफलातून झेल घेत सर्वांना चकित केले. ऑयन मॉर्गनने जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर हवेत जबरदस्त फटका मारला. क्षणभर असे वाटले की, चेंडू सहजपणे सीमा ओलांडेल, पण सीमारेषेजवळ उभा असलेला फाफ डू प्लेसिसचा मात्र वेगळाच हेतू होता.

https://twitter.com/RunMachine_18/status/1442081924160258054?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442081924160258054%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Ffaf-du-plessis-taking-the-catch-of-eoin-morgan-watch-video-84438

फाफ डू प्लेसिसने सीमारेषेजवळ एक अप्रतिम झेल घेतला, पण त्याचा तोल बिघडत असल्याचे पाहून त्याने वेळीच हातातील चेंडू वर फेकला. तितक्यात फाफ डू प्लेसिसने पुन्हा मैदानात उडी घेतली आणि चेंडू हवेत असताना त्याने तो झेल घेतला. याचा निर्णय घेणे अवघड असल्याने मैदानावरील पंचांना तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली.

हेजलवूडने हा चेंडू ऑयन मॉर्गनच्या पायावर टाकला होता. त्याला हा चेंडू लाँग ऑनवर मारायचा होता, पण तो चेंडूला उंचीवर आणि जास्त दूर मारू शकला नाही.

तत्पूर्वी, केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्याच षटकात सलामीवीर शुबमन गिल बाद झाला. त्याने पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत नऊ धावा केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर त्याला अंबाती रायडूच्या अचूक ‘थ्रो’ने टिपले. चेन्नईच्या खेळाडूंनी केकेआरविरुद्ध उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून चाहत्यांचे मन जिंकले.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात केकेआरने चांगली कामगिरी केली नव्हती. ७ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकले होते, पण त्यांनी आयपीएलच्या उर्वरित हंगामात आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---