---Advertisement---

पाकिस्तानी क्रिकेटर म्हणतो, विराट तर आमच्या ‘या’ गोलंदाजाचं गिऱ्हाईक

---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजीबद्दल पाकिस्तानचा नसीम शाहच्या प्रतिक्रियेवर आता फैसल इकबालनेही वक्तव्य केले आहे. फैसलचे असे म्हणणे आहे, की विराटसमोर नसीम समस्या निर्माण करू शकतो. याव्यतिरिक्त फैसल म्हणाला, कदाचित नसीमविरुद्ध फलंदाजी करताना विराट त्याचा गिऱ्हाईकही (सतत एकाच गोलंदाजाकडून बळी होणे) बनू शकतो.

फैसलने (Faisal Iqbal) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले, “विराट एक महान फलंदाज आहे. मी सन्मानाने म्हणतो, आमच्या नसीमची (Naseem Shah) गती आणि स्विंगसमोर विराट (Virat Kohli) केव्हाही बाद होऊ शकतो. मी त्या दोघांमध्ये भविष्यात सामना होण्याची वाट पाहत आहे.”

विराटबद्दल नसीमने केले होते वक्तव्य

पाकिस्तानच्या एका वेबसाईटशी बोलताना नसीम म्हणाला होता, “संधी मिळाली, तर मला भारताविरुद्ध चांगल्या गोलंदाजीबरोबरच चाहत्यांना आनंदीही करायचे आहे. दिग्गज फलंदाजासमोर गोलंदाजी करणे नेहमीच आव्हान असते. परंतु तिथे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते. मला जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा मला भारतीय संघ आणि विराटविरुद्ध खेळायला आवडेल. पाकिस्तान आणि भारतामधील सामना नेहमीच खास असतो. मला सांगितले आहे, की त्या सामन्यापासूनच तुम्ही नायक आणि खलनायक बनू शकता.”

नसीम आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. १६ वर्षांच्या वयात पदार्पण करणाऱ्या या खेळाडूवर सर्वांचे लक्ष होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेत सर्वात कमी वयात असा कारनामा करणारा तो कसोटी गोलंदाज बनला होता.

फैसलला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, की श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंसमोर गोलंदाजी करणे वेगळे आहे. विराटसमोर जागतिक क्रिकेटमधील गोलंदाजांचीही धुलाई होते. नसीम तर आता खूप युवा खेळाडू आहे आणि गोष्टी शिकत आहे.

पाकिस्तानमध्ये विराटबद्दल वक्तव्य करत चर्चेत येण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेक माजी खेळाडू भारतीय क्रिकेटपटूंबद्दल आपल्या यूट्यूब चॅनेलवर चर्चा करत आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-ज्या सचिनची फलंदाजी पहायला ‘तो’ शाळेतून पळाला, त्याच सचिनबरोबर खेळला तब्बल ७४ सामने

-कॅटरिनाचे नाव घेताच सलमान खानने दाखवला युवी- भज्जीला बाहेरचा रस्ता

-या जुळ्या भावांनी गाजवलंय क्रिकेटचं मैदान; केल्यात ३५ हजारपेक्षाही अधिक धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---