विराट कोहली आणि अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई-वडील झाले. विराटने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयी मंगळवारी (20 फेब्रुवारी) माहिती दिली. मुलगी वामिकानंतर यावेळी त्यांना मुलगा झाला आहे, ज्याचे नाव ‘अकाय’ असे ठेवण्यात आले. दुसऱ्यांना आई-वडील बनल्यानंतर विराट आणि अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. असे असले तरी, या दोघांना जी गोष्ट नको होती, अगदी तेच घडताना दिसत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत नाहीये. मालिका सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा वेळ बाकी असताना विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला. पण नंतर त्याने शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमधून देखील माघार घेतली. अखेर विराटने हा निर्णय का घेतला, याविषयी सर्वांना प्रश्न पडले होते. पण विराटने स्पष्टपणे यावर बोलने टाळत वैयक्तिक कारणास्तव ही रजा घेत आहे, असे सांगितले. पण मंगळवारी अखेर विराट इंग्लंडविरुद्ध का खेळला नाही, याचे कारण समजले. वेगळ माध्यमांपासून दूर राहत दुसऱ्यांना आई-वडील बनण्याचा अनुभव विराट आणि अनुष्काला घ्यायचा होता.
दोघांनी ठरवल्याप्रमाणे माध्यमांपासून दूर राहत दुसऱ्या बाळाला जन्म दिला. पण ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताच, काही चुकीच्या गोष्टी घडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ‘अकाय कोहली’ या नावाने अनेक फेक खाती सुरू झाली आहेत. ही सर्व खाती खोटी आहेत, जे विराट आणि अनुष्काला नको आहे. याआधी मुलगी वामिका हिच्याविषयी झालेला आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली होती. याच पार्श्वभूमीवर विराट आणि अनुष्काला ऍक्शन देखील घ्यावी लागली होती. यावेळी अशी परिस्थिती उद्धवू नये म्हणून त्यांना बाळाच्या जन्माची बातमी माध्यमांना कळू दिली नाही. पण आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर देखील या दोघांना त्याचे चुकीचे परिणाम पाहायला मिळत आहेत.
What ” Akaay Kohli ” have account before his birth ???? pic.twitter.com/V9aptiHUm2
— Ajab Niazi (@niazi_54) February 21, 2024
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) February 20, 2024
दरम्यान, विराटच्या अनुपस्थिती भारतीय संघ मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाने भारताला मात दिली. पण पुढच्या दोन्ही सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध मोठ्या अंतराने विजय मिळवला. सध्या भारतीय संघ 2-1 अशा अंतराने पुढे आहे. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघ विजयासाठी उतरेल. हा सामना जिंकल्यानंतर मालिका देखील भारताच्या नावावर होऊ शकते. दुसरीकडे इंग्लंड संघ भारताशी बरोबरी करण्यासाठी खेळेल. (Fake accounts have started by Akaay Kohli’s name)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । बुमराहला रांची कसोटी सामना खेळायचा होता? वेगवान गोलंदाजाबाबत महत्वाची माहिती
आता रोखून दाखवा! आयपीएल कमबॅकसाठी रिषभ पंत रेडी, सराव सामन्यात पाडला धावांचा पाऊस






