पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान गेल्या वर्षभरापासून तुफान फॉर्ममध्ये आहे.
फखर जमानने झिम्बाब्वे विरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात नाबाद 210 धावा केल्या आहेत. या द्विशतकाबरोबरच पाकिस्तानकडून द्विशतक करणारा फखर जमान पहिला फलंदाज बनला आहे.
आता फखर जमानचे पुढचे लक्ष आणखी एका विश्वविक्रमाकडे आहे. फकारने 17 एकदिवसीय सामन्यांच्या 17 डावात 980 धावा केल्या आहेत. त्याला आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा करण्यास 20 धावांची गरज.
फखर जमानने पुढच्या तीन सामन्यात 20 धावा करण्यात यशस्वी झाल्यास, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणार जगातील पहिला फलंदाज बनू शकतो.
यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करण्याचा पराक्रम वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर व्हिव रिचर्ड्स यांनी 38 वर्षांपूर्वी केला होता. व्हिव रिचर्ड्स यांनी 1980 साली 21 एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 1000 धावा केल्या होत्या.
या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या चार सामन्यात फखर जमानने 430 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-अनिल कुंबळेचा विक्रम थोडक्यात वाचला, दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूने एका डावात बाद केले 9 फलंदाज
-अर्जुन तेंडुलकरची सुटका नाही, नेटकऱ्यांनी धरले पुन्हा एकदा धारेवर