इंडियन प्रीमियर लीग २०२२ला नवा विजेता मिळाला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यात ७ विकेट्सने पराभूत ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरलेल्या गुजरातला विजेता बनवण्यात प्रशिक्षक आशिष नेहरा याचे महत्त्वाचे योगदान राहिले.
हार्दिककडे (Hardik Pandya) संघाचे नेतृत्त्वपद सोपवण्यापासून ते मजबूत गोलंदाजांना विकत घेण्यापर्यंत आणि संघात मॅच विनर खेळाडूंना सहभागी करण्यात नेहराची महत्त्वाची भूमिका राहिली. यानंतर ट्रॉफी घरी गेलेल्या नेहराच्या कुटुंबियांनी (Nehra Family) अनोखी अशी कृती करत सर्वांचे लक्ष (Nehra Family Slept With Trophy) वेधले आहे.
पत्नीने सोशल मीडियावर शेअर केला फोटो
गुजरात संघाच्या (Gujrat Titans) विजयामुळे नेहरासह त्याचे कुटुंबियही खूप खुश आहेत. आनंदाच्या भरात नेहराचे पूर्ण कुटुंबीय विजयानंतर आयपीएल चषकासह झोपले. नेहराची पत्नी रुशमा नेहराने (Rushma Nehra) ट्रॉफीसोबत झोपल्याचा संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करत रुशमाने लिहिले आहे की, ‘एक स्वप्न पूर्ण झाले आहे. नेहराजी आणि पूर्ण गुजरात संघाचा खूप अभिमान वाटतोय’. या पोस्टवर कमेंट करत नेहराने (Ashish Nehra) लिहिले आहे की, ‘छा गये नेहराजी.’
https://www.instagram.com/p/CeL4ggsvtD_/?utm_source=ig_web_copy_link
नेहरा बनला पहिलाच भारतीय प्रशिक्षक
दरम्यान नेहरा आपल्या आयपीएल संघाचा किताब जिंकून देणारा पहिलाच भारतीय प्रशिक्षक बनला आहे. २००८ पासून आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ आयपीएलचे विजेते बनले आहेत. यामध्ये न्यूझीलंडच्या स्टिफन फ्लेमिंगने ४ वेळा, श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेने ३ वेळा आणि ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हर बेलिसने २ वेळा प्रशिक्षक म्हणून आयपीएल चषक जिंकला आहे.
तसेच टॉम मूडी, रिकी पाँटिग, जॉन राईट, डॅरेन लेहमन आणि शेन वॉर्न प्रत्येकी १ वेळा विजेते प्रशिक्षक बनले आहेत. आता या यादीत नेहराचेही नाव जोडले गेले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बड्डे स्पेशल: अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, आरसीबीच्या रजत पाटीदारची प्रेरणादायी कहानी
दु:खद! इंग्लंडच्या माजी यष्टीरक्षकाचे निधन, क्रिकेट कारकिर्दीत केल्या होत्या ४० हजार धावा
दीपक चाहर आणि जयाच्या लग्नाची तयारी जोरात, संगीत अन् मेहंदी कार्यक्रमातील Photo होतायत व्हायरल






