सध्या आयपीएलचा 18वा हंगाम सुरू आहे. या हंगामात आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने दमदार कामगिरी केली आहे. आरसीबीसाठी विराट कोहली चमकदार कामगिरी करतोय. यादरम्यान बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल वैद्य यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. (Rahul Vaidya Statement On Virat Kohli) त्यांनी स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल हे विधान केले आहे. खरंतर, त्यांनी विराट कोहली आणि त्याच्या चाहत्यांना जोकर म्हटले आहे. चला तर मग या बातमीद्वारे सविस्तर जाणून घेऊया.
खरंतर, राहुल वैद्य यांनी त्यांच्या इंस्टा स्टोरीमध्ये कोहली आणि त्याच्या चाहत्यांना ‘जोकर’ म्हटले होते, जी स्टोरी वेगाने व्हायरल झाली आहे. यामागील कारण समजून घेण्यासाठी, तुम्हाला आधी गेल्या काही दिवसांत व्हायरल झालेली एक बातमी जाणून घ्यावी लागेल. विराट कोहली अलीकडेच टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोला लाईक केल्यामुळे खूप चर्चेत होता, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी विविध अंदाज लावण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर, कोहलीने त्यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, हे अल्गोरिथममुळे घडले. यानंतर राहुल वैद्य यांनी त्यांच्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले की, विराट कोहलीचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर आहेत. त्यानंतर तो निशाण्यावर आला.
ट्रोल झाल्यानंतर, राहुलने दुसऱ्या एका इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले, “तुम्ही मला शिवीगाळ करत आहात, ते चांगले आहे. पण तुम्ही माझ्या बहिणीला, माझ्या पत्नीलाही शिवीगाळ करत आहात, ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, ते बरोबर नाही. म्हणूनच मी बरोबर म्हणतो की विराट कोहलीचे चाहते जोकर आहेत. दोन पैशांचे जोकर.”






