भारतीय क्रिकेटला तब्बल १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे दिल्लीचे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त तारक सिन्हा यांचे शनिवारी (६ नोव्हेंबर) पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सिन्हा हे ७१ वर्षांचे होते. वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
या खेळाडूंना दिले प्रशिक्षण
तारक सिन्हा हे भारतीय क्रिकेटला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या तब्बल १२ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये सुरींदर खन्ना, रणवीर सिंग, रमण लांबा, मनोज प्रभाकर, अजय शर्मा, केपी भास्कर, अतुल वासन, आकाश चोप्रा, आशिष नेहरा, संजीव शर्मा, शिखर धवन व रिषभ पंत या दिग्गजांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवलेले तब्बल १०० खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटू अंजूम चोप्रा हिनेदेखील त्यांच्याचकडून क्रिकेट प्रशिक्षण घेतलेले.
द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे पाचवे क्रिकेट प्रशिक्षक
तारक सिन्हा हे द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे केवळ पाचवे क्रिकेट प्रशिक्षक होते. रमाकांत आचरेकर, सुनीता शर्मा, देशप्रेम आझाद व गुरुचरण सिंग यांना हा सन्मान मिळाला होता.
अशी राहिली कारकीर्द
दिल्लीचे आचरेकर म्हणून ओळखला गेलेल्या तारक सिन्हा यांनी प्रशिक्षक म्हणून आपली वेगळी छाप सोडली. त्यांच्याच मार्गदर्शनात दिल्लीने १९८५-१९८६ या हंगाम आता रणजी विजेतेपद पटकावलेले. २००१-२००२ मध्ये त्यांना भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात आले. ते पदावर असताना झुलन गोस्वामी व मिताली राज या दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पदार्पण केले होते. ते प्रशिक्षक असताना भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विदेशी भूमीवरील आपला पहिला कसोटी विजय मिळवला होता. भारतीय महिला क्रिकेट सुधारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/virat-kohli-visit-scotland-dressing-room/
https://mahasports.in/team-india-celebrate-virats-33-birthday/