भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. हे आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चं होम ग्राउंड आहे. या कसोटी दरम्यान एका चाहत्यानं कर्णधार रोहित शर्माला आयपीएल बाबत प्रश्न विचारला. चाहत्यानं ‘हिटमॅन’ला त्याला आयपीएल 2025 मध्ये कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल?, असं विचारलं. यावर रोहित शर्मानं दिलेलं उत्तर सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्टेडियममध्ये उपस्थित असलेला चाहता ‘हिटमॅन’ला प्रश्न विचारतो, “रोहित भाई, आयपीएलमधील कोणती टीम?” यावर रोहित वरती पाहतो आणि पुन्हा खाली पाहून म्हणतो, “कुठे पाहिजे बोल?”. यावर तो चाहता म्हणतो, ”भाई आरसीबीमध्ये या. लव्ह यू भाई.” रोहितच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरनं कमेंट केली, “मला नाही वाटत की रोहित आरसीबीमध्ये जाईल.” तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Fan: “Which team in the IPL”
Rohit Sharma replied “Where do you want”
Fan: “Come to RCB”
Typical Rohit Sharma 😄👌 pic.twitter.com/A4XHZF8A3p
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2024
रोहित शर्मा हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मुंबईनं त्याच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र आयपीएल 2024 मध्ये रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचं नेतृत्व देण्यात आलं, ज्यामुळे अनेक चाहते नाराज झाले होते. रोहित 2011 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. तो 2013 मध्ये संघाचा कर्णधार बनला होता.
आयपीएल 2025 साठी रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. फ्रँचायझी जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकते. यामध्ये लिलावातील एक ‘राईट टू मॅच’ (RTM) कार्डचा देखील समावेश आहे. 2022 मध्ये झालेल्या शेवटच्या मेगा लिलावात एका संघाला चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली होती.
हेही वाचा –
“हा क्रिकेटपटू 2024 चा जावेद मियांदाद आहे”, संजय मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य
हर्टब्रेक..!! रिषभ पंतचं शतक अवघ्या 1 धावेनं हुकलं, पुन्हा एकदा ठरला नर्व्हस नाईन्टीजचा बळी
ind vs nz; विराट कोहलीच्या बालेकिल्ल्यात हिटमॅनच्या नारा, पाहा VIDEO