---Advertisement---

सरफराजनं विचित्र पद्धतीनं उड्या मारून पंतला आऊट होण्यापासून रोखलं, मैदानातील मजेशीर VIDEO व्हायरल

On: शनिवार, ऑक्टोबर 19, 2024 3:01 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात सरफराज खाननं शानदार शतक झळकावलं. यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचं पहिलं शतक आहे. सरफराजच्या या खेळीदरम्यान एक मजेशीर घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सरफराज रिषभ पंतला धाव घेण्यापासून रोखण्यासाठी विचित्र पद्धतीनं उड्या मारताना दिसतो. जर पंत ही धाव घेण्यासाठी पळाला असता, तर तो निश्चितच धावबाद झाला असता. मात्र सरफराज खाननं त्याला वाचवलं.

वास्तविक, सरफराज खान या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तर रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना या दोघांमध्ये एक घटना घडली. सरफराजनं एकेरी धाव घेतली होती. यानंतर रिषभ पंत दुसरी धाव घेण्यासाठी पळाला होता. मात्र सरफराजनं त्याला रोखलं. यामुळे पंत धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला. पंतला रोखण्यासाठी सरफराजनं खेळपट्टीवरच उड्या मारायला सुरुवात केली. हे पाहून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेले खेळाडूही हसायला लागले. सरफराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

भारताकडून सरफराजनं दुसऱ्या डावात शतक ठोकलं. तर रिषभ पंत देखील अर्धशतक ठोकून त्याच्यासोबत क्रिजवर आहे. पहिल्या डावात टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब झाली होती. संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला होता. सरफराज तर भोपळाही फोडू शकला नव्हता. त्याच्यासोबत भारताचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले होते. मात्र आता दुसऱ्या डावात टीम इंडियानं शानदार कमबॅक केला आहे.

हेही वाचा – 

शुबमन गिलच्या स्थानाला धोका? अष्टपैलू खेळाडूनं तिसऱ्या क्रमांकावर ठोकलं शतक
हेल्मेट काढलं, मैदानाभर धावला…सरफराजचं सेंच्युरी सेलिब्रेशन एकदा पाहाच; कोहली-रोहितनंही दिलं स्टँडिंग ओव्हेशन!
सरफराजनंतर श्रेयस अय्यरचा धमाका! तुफानी शतक ठोकून दिलं निवडकर्त्यांना उत्तर
 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---