चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सोमवारी (१५ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघाने सामन्यावर पूर्ण पकड मिळवलेली दिसून येते. मात्र, जेवणासाठी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला असता, एका चाहत्याने कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून मैदानात दाखल होण्याचा प्रताप केला.
प्रेक्षकांना मिळाली आहे मैदानात येण्याची परवानगी
कोरोना महामारीमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धां विनाप्रेक्षक पार पडत होत्या. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामनाही बंद दाराआड खेळला गेला होता. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी मैदान क्षमतेच्या ५०% टक्के प्रेक्षकांना मैदानात हजर राहून सामना पाहण्यास परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयने त्यासाठी देखील कडक नियमावलीचा अवलंब केलेला दिसून येतो. प्रेक्षकांनी मैदानात येऊ नये म्हणून प्रेक्षागाराच्या समोर तब्बल १२ मीटर उंचीची जाळी लावण्यात आली आहे.
प्रेक्षकाने तोडला नियम
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जेवणासाठी खेळ थांबला असता एका भारतीय चाहत्याने मैदानात येण्याचा प्रताप केला. इंग्लंडचे काही राखीव खेळाडू मैदानाच्या मधोमध सराव करत होते. त्यावेळी भारतीय संघाची जर्सी घातलेला एक चाहता तब्बल १२ मीटर उंचीची जाळी उतरून मैदानात दाखल झाला. तो इंग्लंडच्या खेळाडूंकडे हस्तांदोलनासाठी धावला. मात्र, खेळाडूंनी त्याला परत जाण्यास सांगितले. तो देखील त्यांच्या विनंतीस मान देऊन पुन्हा जाळी चढून प्रेक्षकात सामील झाला. त्यानंतर, पोलिसांनी त्या युवकास मैदानातून बाहेर घालवले.
A possible security breach at Chepauk? A young kid climbs the railings and enters the field during lunch break. Didn't get close to the English players. Just waved from a distance and went back. Cops have him. @sportstarweb pic.twitter.com/qNHxuQuXMY
— Ayan (@ayan_acharya13) February 15, 2021
दुसऱ्या कसोटीवर भारतीय संघाची पकड
पहिल्या सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात विजयाच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवली आहे. पहिल्या डावात ३२९ धावा उभारल्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर गुंडाळला. तिसऱ्या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला असता भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात ८ बाद २२१ धावा केल्या आहेत. सध्या भारतीय संघाकडे ४१६ धावांची आघाडी असून, भारतीय संघ इंग्लंड ला विजयासाठी मोठे आव्हान देणार असल्याचे निश्चित झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईचा सरंपच! अश्विनची ‘ही’ कामगिरी पाहून समलोचकांनी दिली भन्नाट उपमा, तुम्हीही असंच म्हणाल
व्हिडिओ: उडता ऑली पोप..! हवेत सूर मारत पठ्ठ्याने पकडला अविश्वसनीय झेल, रहाणे बघतचं राहिला
इंग्लंडचा धोनी!! पुजारा आणि रोहितनंतर बेन फोक्सच्या चपळाईपुढे रिषभ पंतही गपगार