भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे असंख्य चाहते आहेत. भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहते त्याला फॉलो करत असतात. मैदानात आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला विराट कोहली मैदानाबाहेर आपल्या लूक्स आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी तास-न-तास वाट पाहत असतात. नुकतेच एका मुलीने तर आपल्या हातावर विरुष्काच्या नावाचा टॅटू आपल्या गोंदवून घेतला होता, ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघेही २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. तेव्हापासून हे दोघेही सोशल मीडियावर विरुष्का या नावाने ओळखले जातात. या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून आंध्रप्रदेशमध्ये राहणारी हर्षिताने विरुष्का नावाचा टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेतला होता. तसेच असे असंख्य चाहते आहे ज्यांनी विराट कोहलीवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या अंगावर देखील टॅटू काढले आहेत.
पिंटू राजने काढले १५ टॅटू
विराट कोहलीचा एक जबरा फॅन ओडिशामध्ये देखील राहतो. या जबरा फॅनचे नाव पिंटू राज असे आहे. त्याचे विराट कोहलीप्रती इतके प्रेम आहे की, त्याने चक्क आपल्या छातीवर विराट कोहलीचा टॅटू काढला आहे. तर पाठीवर जर्सी नंबर १८ आणि त्याचे नाव गोंदवून घेतले आहे. इतकेच नव्हे तर, विराटने आतापर्यंत जितके पुरस्कार मिळवले आहेत, ते त्याने आपल्या पाठीवर लिहिले आहेत. त्याच्या शरीरावर एकूण १५ टॅटू आहेत. जेव्हा विराट कोहली त्याला भेटला होता. तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तसेच विराट कोहलीने ही त्याला प्रेमाने मिठी मारली होती.
सामना सुरू असताना चाहत्याने घेतली होती मैदानात एन्ट्री
यावर्षी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील डे नाइट कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यादरम्यान,कोहलीचा एक चाहता चक्क सामना सुरू असताना मैदानात शिरला होता. तेव्हा त्याने विराटच्या जवळ जाऊन विराटला मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विराटने कोविड १९ च्या नियमावलीचे पालन करत त्याला समजावून सांगितले आणि माघारी धाडले होते. परंतु पोलिसांनी या चाहत्याबद्दल तक्रार नोंदवली होती.
वयोवृद्ध आजींना दिली होती भेट
हा खास क्षण आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०१९ मधील आहे. जेव्हा विराटने सामना पाहण्यासाठी आलेल्या ८७ वर्षीय चारुलता पटेल यांची भेट घेतली होती. या वयात देखील ते भारतीय संघाला चियर करण्यासाठी मैदानात आल्या होत्या. त्यामुळे विराटने जाऊन त्यांची भेट घेतली होती. तसेच त्यांचे आशीर्वाद देखील घेतले होते.
दिव्यांग चाहतीलाही दिली होती भेट
या चाहतीला भेटण्यासाठी स्वतः विराट कोहली गेला होता. पूजा नावाची ही चिमुकली विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. २०१९मध्ये भारतीय संघाने बांगलादेश संघाला पराभूत केल्यानंतर त्याने आपली ऑटोग्राफ केलेली जर्सी तिला भेट म्हणून दिली होती.
जेव्हा चाहत्याने विराट कोहलीला घाबरले होते
विराट कोहली जेव्हा जेव्हा आपल्या चाहत्यांना भेट देतो तेव्हा तो खूप प्रेमाने भेटतो. तसेच तो त्यांच्यासोबत फोटोज् देखील काढतो. परंतु एकदा अफगाणिस्तानच्या एका चाहत्याने विराटला धमकावून फोटो क्लिक करण्याची मागणी केली होती. परंतु गर्दी असल्याने त्याने नकार दिला होता. तेव्हा त्या चाहत्याने विराटचा हात पकडला होता. इतकेच नव्हे तर तो हट्ट करू लागला होता की, मला फोटो हवा आहे. त्यावेळी विराट घाबरला आणि त्याने सिक्युरिटी गार्डला बोलावले होते.
डेविड वॉर्नरची मुलगी देखील आहे विराटची चाहती
ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीचा फलंदाज डेविड वॉर्नरची मुलगी इंडी देखील विराट कोहलीची चाहती आहे. ती नेहमीच बॅट धरून विराट कोहलीच्या शॉटचा सराव करत असते. तसेच विराटने तिला आपली ऑटोग्राफ आली जर्सी भेट म्हणून दिली होती.
सोशल मीडियावर ११५ मिलियन फॉलोअर्स
विराट कोहली हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतो. त्याचे इंस्टाग्रामवर ११५ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर देखील ३ कोटी ४८ लाख इतके फॉलोवर्स आहेत. तसेच तो सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ममतांनी करुन दाखवलं! माजी भारतीय क्रिकेटपटूच्या हातात दिली बंगालच्या क्रीडामंत्रालयाची धुरा
लग्नाआधीच केकेआरच्या ‘या’ शिलेदाराच्या घरी हालणार पाळणा, लवकरचं बनणार ‘बापमाणूस’
ओहो! कोणाचीही फिकीर न करता राहुल तेवतियाचा खुल्लम खुल्ला प्रपोजल, पाहा तो भारी क्षण