---Advertisement---

अर्जेंटिना पराभूत झाल्याने चाहत्याने सुसाइड नोटसह सोडले घर

On: शुक्रवार, जून 22, 2018 6:23 PM
---Advertisement---

फिफा विश्वचषक स्पर्धा हळूहळू रंगतदार होत चालली आहे. या स्पर्धेचे चाहतेही जगभरात आहेत. हे चाहते आपल्या आवडत्या संघाला वेगवेगळ्या पद्धतीने पांठिबाही देत असतात.

पण भारतातल्या एका अर्जेंटिनाच्या चहात्याने तर संघ पराभूत झाला म्हणून घरच सोडले आहे. त्याचबरोबर त्याने सुसाईड नोटही लिहिली आहे.

हा चाहता केरळचा असुन दिनू अॅलेक्स असे त्याचे नाव आहे. तो 30 वर्षांचा आहे. काल, 21 जूनला क्रोएशिया विरुद्ध अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव झाला. हा पराभव सहन न झाल्याने त्याने घर सोडले आहे.

त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की तो या पराभवाने नाराज झाला आहे आणि तो त्याचे आयुष्य संपवायला चालला आहे.

या प्रकरणबद्दल पोलिस म्हणाले की ते त्याच्या घराजवळील नदीमध्ये त्याचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

मेस्सीचा अर्जेंटिना संघ पडणार फिफा विश्वचषकातून बाहेर ?

म्हणून स्टार फुटबॉलपटू मेस्सी होतोय ट्रोल…

रशियात सुरु आहे चमचेगिरी!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment