संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेल्या इंडियन प्रिमीयर लीगच्या तेराव्या हंगामात काही खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. यात दिल्ली कॅपिटल्सच्या यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचाही समावेश आहे. दिल्लीच्या या मॅच विनर खेळाडूला यंदा त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला चाहत्यांसह माजी क्रिकेटूंनीही त्याच्यावर टीका केली. परंतु, आता एका चाहत्याने चक्क पंतच्या बहिणीजवळ त्याची तक्रार केली आहे.
चाहत्याची पंतच्या बहिणीला विनंती
पंतची बहीण साक्षी पंत ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. नुकताच साक्षीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. तिच्या त्या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘दीदी पंतला विचार की तो इतकी बचावात्मक फलंदाजी करत का आहे? त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळायला सांग. उगाचच दिल्ली संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगचे बोलणे ऐकून स्वत:चा खेळ बिघडवू नको.”
थोडक्यात सांगायचे झाले तर, त्या चाहत्याला पंतने पाँटिंगच्या सांगण्यावरुन त्याच्या नैसर्गिक खेळीमध्ये बदल केला आहे असे वाटले असावे.
https://www.instagram.com/p/CHNjH7asFy6/?utm_source=ig_web_button_share_sheet
साक्षी पंतविषयी थोडेसे
पंतची बहीण साक्षी पंत ही उत्तराखंडमध्ये राहते. तिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिला प्रवास करण्याची खूप आवड आहे. तसेच तिला क्रिडा प्रकारात बास्केट बॉल खेळायला आवडते. ती कधी-कधी पंतला चीयर करण्यासाठी स्टेडियमध्ये येत असते.
पंतची आयपीएल २०२०मधील आकडेवारी
गेल्या दोन आयपीएल हंगामांच्या आकडेवारीला पाहता यावर्षी पंतची फलंदाजी थंडावलेली दिसली. त्याने पूर्ण हंगामात १२ सामने खेळले असून २८.५०च्या सरासरीने २८५ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याला एक अर्धशतकही लगावता आले नाही. याउलट आयपीएल २०१९मध्ये त्याने १६ सामन्यात ४८८ धावा आणि आयपीएल २०१८मध्ये १४ सामन्यात ६८४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैवच म्हणायचं अन् काय! फ्री हीट असनूही फलंदाज झाला बाद, पाहा कसं
भारतीय क्रिकेटरबरोबर पार्टी करताना दिसली आंद्रे रसेलची पत्नी, हुक्का घेत…
Corona Effect: ख्रिस गेल, डू प्लेसिस यांचा सहभाग असलेली ‘ही’ मोठी स्पर्धा तिसऱ्यांदा स्थगित
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या भीडूंची प्लेइंग इलेव्हन, धोनीला कर्णधारपद तर यष्टीरक्षक…






