भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चमकला. मात्र, स्पर्धेनंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. अशातच विराट आपल्या फलंदाजीमुळे नाही, तर एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेतील एक व्यक्ती दावा करत आहे की, कपड्यांमुळे त्याला विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री मिळत नाहीये.
व्हिडिओत व्यक्तीने स्वत:ला विराट कोहली (Virat Kohli) याचा मोठा चाहता असल्याचे सांगितले आहे. या चाहत्याने म्हटले की, “आपल्या मुंबईच्या प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर मी माझ्या आवडत्या क्रिकेटपटूच्या जुहू येथील वन8 कम्यून रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी पोहोचलो. मात्र, माझ्या कपड्यांमुळे मला हॉटेल व्यवस्थापनाने रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री दिली नाही. कारण, त्यांच्या मते, माझे कपडे, रेस्टॉरंटच्या ड्रेस कोडनुसार नव्हते. खूपच मोठ्या निराशेने मी इथून परत जात आहे.” यासह चाहत्याने विराटशी हॉटेल स्टाफच्या या वर्तनासाठी कारवाई करण्याची आशाही व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी म्हटले आहे की, विराटच्या रेस्टॉरंटचा एक ड्रेस कोड आहे आणि ते प्रत्येक ग्राहकाने फॉलो करायचा असतो. तसेच, काहींनी पारंपारिक ड्रेस परिधान केल्यामुळे व्यक्तीला एन्ट्री न दिल्यामुळे विराटवर टीकाही करत आहेत.
Person with Veshti was not allowed in @imVkohli 's Restaurant
Very nice da👌 pic.twitter.com/oTNGVqzaIz
— உன்னைப்போல் ஒருவன் (@Sandy_Offfl) December 2, 2023
आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, विराट कोहली याविषयी काही कारवाई करतो की नाही. विराटविषयी बोलायचं झालं, तर तो अखेरचा विश्वचषकात खेळताना दिसला होता. विराट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता. त्याने यादरम्यान 11 सामन्यात 95.62च्या सरासरीने सर्वाधिक 765 धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. दुसरीकडे, 35 वर्षीय विराट आता येत्या 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसेल. (fan stopped from entering cricketer virat kohli s one 8 commune restaurant due to traditional attire see video)
हेही वाचा-
ही तेंडुलकरची महानता! अफगाणी ओपनरविषयी जडेजाने सांगितला किस्सा; म्हणाला, ‘मी त्याला सचिनचे पुस्तक वाचताना…’
मॅक्युलमला झाली IPL इतिहासातील पहिल्या शतकाची आठवण; म्हणाला, ‘त्या शतकाने माझे आयुष्य बदलले, मला कुणीही…’