सोमवारी (दि. 4 डिसेंबर) दक्षिण आफ्रिका संघाने भारताविरुद्धच्या मायदेशातील तिन्ही क्रिकेट प्रकाराच्या मालिकेसाठी आपला संघ घोषित केला. याचदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या वनडे आणि टी20 संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी मोठा खुलासाही केला. त्यांनी सांगितले की, यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छित होत, पण त्याला असे करण्यापासून रोखण्यात आले.
खरं तर, क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशात त्याने नुकत्याच संपलेल्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेपूर्वी घोषणा केली होती की, तो स्पर्धेनंतर वनडे क्रिकेटला रामराम ठोकेल. मात्र, डी कॉकला आधी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त व्हायचे होते, पण संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर, त्याने फक्त वनडेतून निरोप घेतला.
डी कॉकला पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धा लक्षात घेता दक्षिण आफ्रिकेने आपल्या योजनेत सामील केले आहे. मात्र, हा फलंदाज भारताविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेचा भाग नसेल. कारण, तो त्यादरम्यान बिग बॅश लीगच्या आगामी हंगामाचा भाग असणार आहे. ही स्पर्धा 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे.
माध्यमांशी बोलताना रॉब वॉल्टर (Rob Walter) म्हणाले की, “क्विनीसोबत बोलताना जेव्हा तो वनडे क्रिकेटपासून दूर जात होता, खरं तर त्याची क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याची योजना होती. मी त्याला त्याचा निर्णय रोखण्यास सांगितले. त्याला बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्याची टक्कर भारताविरुद्धच्या मालिकेशी होत आहे. त्याला खेळात कायम ठेवण्यासाठी हाच निर्धार होता.”
डी कॉकचे विश्वचषकातील प्रदर्शन
विशेष म्हणजे, क्विंटन डी कॉक वनडे विश्वचषक 2023 (Quinton De Kock World Cup 2023) स्पर्धेत चांगलाच चमकला होता. त्याला खेळताना पाहून असे कुणालाच वाटले नसेल की, तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याने जी कामगिरी यादरम्यान केली, ती कुणालाच जमली नाही. डी कॉकने 10 सामन्यात 594 धावा केल्या. या धावा करताना त्याने तब्बल 4 शतके मारली. इतर फलंदाज विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत 3 शतकांपर्यंत गेले, पण डी कॉकशिवाय कुणालाच 4 शतके मारता आली नाहीत. (south africa white ball coach rob walter reveals wicketekeeper batsman quinton de kock wanted to retire from all formats after cwc23)
हेही वाचा-
सर्वजण उन्हात तळत होते, पण सॅम करनला सुचला उपाय! मागचा पुढचा विचार न करता सनग्लास घालून खेळला
फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धा 2023 । मुलांच्या गटात लॉयला तर मुलींच्या गटात सेंट जोसेफचे एकतर्फी विजेतेपद