---Advertisement---

नंबर १ फॅनगर्ल! विराटसाठी ओलांडल्या होत्या सर्व सीमा; म्हणाली, ‘कृपया मला कोहली द्या’

On: रविवार, जून 6, 2021 2:13 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सर्वांच्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने गेल्या काही वर्षांत भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. फलंदाज आणि कर्णधार म्हणून तो हिट आहेच परंतु तो आपल्या स्टाईल आणि लुक्समुळेही अनेकदा चर्चेत असतो. देश विदेशातील असंख्य मुली विराट कोहलीची झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच सोशल मीडियावर विराट कोहलीला भारतातून असंख्य लोक फॉलो करतात.

तसेच शेजारी देशात देखील त्याला फॉलो करणारा मोठा चाहतावर्ग आहे. असाच एक किस्सा २०१९ विश्वचषक स्पर्धा सुरु असताना घडला होता. जेव्हा विराट कोहलीच्या एका चाहतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या एका मुलीने म्हटले होते की, “मला विराट देऊन टाका.”

या मुलीचे नाव रिजला रेहान असे होते. यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र रिजला रेहानची हवा पसरली होती. रिजला रेहानाबद्दल बोलायचं झालं तर, ती क्रिकेटची खूप मोठी प्रशंसक आहे. अनेकदा तिने क्रिकेट सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. २०१९ मध्ये झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरी सामन्यात रिजला रेहान देखील भारतीय संघाला समर्थन करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिला आधीच माहित होते कि, भारतीय संघ टॉप-४ मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे तिने आधीच तिकीट खरेदी केले होते. हे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

रिजला रेहानने २०१९ विश्वचषक स्पर्धेदरम्यान एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, अशी कुठली गोष्ट आहे जी तुला भारतीय संघाकडून पाकिस्तानला भेट द्यायला आवडेल? या प्रश्नाचे उत्तर देत ती म्हणाली होती की, “मला विराट देऊन टाका, कृपया मला विराट देऊन टाका.”

उपांत्य फेरी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हाच सामना एमएस धोनीच्या आयुष्यातील शेवटचा सामना ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

आजही इंग्लंडच्या मैदानावर यष्टीरक्षक धोनीचाच धाक, निवृत्तीच्या ६ वर्षांनंतरही ‘हा’ विक्रम अबाधित

‘कोहली-विलियम्सनच्या नेतृत्त्वात मोठे अंतर, WTC फायनलमध्ये दोघांची अग्निपरिक्षा,’ माजी प्रशिक्षकाचे मत

स्टोक्सच्या सावत्र वडिलांनी गोळी झाडून केलती मुलांची हत्या, वाचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---