भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर युवा फलंदाज तिलक वर्मा याला 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत मालिकेतील 3 सामने पार पडले आहेत. या तिन्ही सामन्यानंतर भारतीय संघ 1-2ने पिछाडीवर आहे. मालिकेत मिळालेल्या या संधीचा तिलकने फायदा घेत तिन्ही सामन्यात शानदार फटकेबाजी केली. पहिल्या दोन सामन्यात त्याच्या यजमानांच्या विजयापेक्षा जास्त चर्चा तिलकच्या फलंदाजीची झाली. आता मंगळवारी (दि. 08 ऑगस्ट) पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यातही त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. यावेळी भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला, पण कर्णधार हार्दिक पंड्या याचे एक कृत्य चाहत्यांना आवडले नाही.
आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तिलक वर्मा (Tilak Varma) तिसऱ्याच टी20 सामन्यात सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याला 1 धाव कमी पडली. यामागील कारण भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला म्हटले जात आहे. अशात संतापलेल्या चाहत्यांनी पंड्याला सोशल मीडियावर अनफॉलो करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काहींनी धोनीची आठवण करून दिली आहे.
झाले असे की, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या 83 धावांच्या खेळीने भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला होता. सूर्या बाद झाल्यानंतर क्रीझवर पंड्या आला. ही घटना त्यावेळची आहे, जेव्हा भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. कर्णधाराने तिलकला मोठे फटके खेळण्यास नकार दिला. त्यांचे संभाषण स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले. पंड्या म्हणत होता की, “तुला सामना संपवायचा आहे, अखेरपर्यंत खेळ, नाबाद राहिल्याचा फरक पडतो.” मात्र, जेव्हा भारताला विजयासाठी 3 धावांची गरज होती, तेव्हा तिलकने 1 धाव काढून 49 धावा केल्या. स्ट्राईवर आलेल्या पंड्याने तिलकच्या अर्धशतकाला महत्त्व दिले नाही आणि युवा फलंदाजाला स्ट्राईक देण्याऐवजी स्वत:च षटकार खेचत सामना संपला.
त्यामुळे आता चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. अनेक चाहत्यांनी हार्दिक पंड्या स्वार्थी कर्णधार (Hardik Pandya Selfish Captain) असल्याचे म्हणत अनफॉलो करत आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
#HardikPandya selfish pic.twitter.com/naqAyOH1Fk
— गोपाळ सुलोचना रामचंद्र पार्टे (@GopalParte) August 8, 2023
चाहत्यांना का आठवला धोनी?
पंड्यावर संतापलेल्या चाहत्यांना यावेळी धोनीची आठवण आली. एमएस धोनी (MS Dhoni) नेहमीच सामना फिनिश करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, धोनी अनेकदा युवा फलंदाजांना सामना फिनिश करण्याची संधीही देताना दिसला आहे. विराट कोहली याच्यासोबत एकदा फलंदाजी करताना धोनीचा जुना व्हिडिओ चाहते शेअर करत आहेत. ज्यावेळी धोनीने विराटला सामना फिनिश करण्यास म्हटले होते आणि एक धावही घेतली नव्हती. त्यानंतर दोघेही हसताना दिसले होते. धोनीची आठवण काढत चाहते पंड्यावर टीकास्त्र डागत आहेत.
https://twitter.com/Jagadishroyspr/status/1688978460872781824?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1688978460872781824%7Ctwgr%5E9992fd6d3b00e1aad6af65463b51a705fab38a5d%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fcricket%2Fselfish-captain-fans-angry-hardik-pandya-because-he-did-not-give-chance-tilak-verma-to-complete-his-fifty-ind-vs-wi-3rd-t20-7179311.html
तिसऱ्या टी20विषयी
सूर्यकुमार यादव (83) आणि तिलक वर्मा (नाबाद 49) यांच्या जोरावर भारतीय संघाने 160 धावांचे आव्हान 7 विकेट्स राखून 164 धावा चोपत पूर्ण केले. हे आव्हान भारताने 13 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. पदार्पणवीर यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याला 1 धावेवर तंबूत परतावे लागले. मात्र, ‘करो वा मरो’ सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. (fans angry on hardik pandya says selfish captain because he did not give chance tilak verma to complete his fifty 3rd t20 match)
महत्त्वाच्या बातम्या-
अहमदाबादबाहेर गिलची दांडी गुल! टी20 करियरची आकडेवारी अत्यंत लाजिरवाणी, नक्की पाहा
सूर्या-तिलकच्या झंझावाताने टीम इंडिया विजयी रेषेपार! शानदार कमबॅकसह मालिकेतील आव्हान कायम