---Advertisement---

बीसीसीआय त्याच्यावर अन्याय करतेय?, त्रिपाठीला पुन्हा दुर्लक्षित केल्याने भडकले चाहते; प्रतिक्रियांचा महापूर

Rahul-Tripathi-Ganguly
---Advertisement---

भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात गुरुवारी (१८ ऑगस्ट) पहिला वनडे सामना खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने पुनरागमन केले. तसेच युवा इशान किशनलाही ३ सलामीवीर संघात असतानाही जागा देण्यात आली. परंतु सर्वांच्या नजरा लागून असलेल्या राहुल त्रिपाठी याला पुन्हा एकदा दुर्लक्षित करण्यात आले. 

३१ वर्षीय त्रिपाठीला (Rahul Tripathi) त्याच्या आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात (Team India) निवडले गेले होते. त्याला यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठीही जागा दिली गेली होती. परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्यात तो अयशस्वी ठरला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धही निवड झाल्यानंतरही तो भारतीय संघाकडून पदार्पण करू शकला नव्हता. परंतु आता वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्रिपाठीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा रिकामी होईल असे वाटत होते. त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाईल, अशी अपेक्षा होती.

मात्र पुन्हा एकदा संघ व्यवस्थापनाने त्रिपाठीला बाकावरच बसवले आहे. त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर इशान किशनला संधी दिली गेली आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर चाहते भडकले आहेत. ट्वीटरच्या माध्यमातून चाहते व्यक्त होत आहेत.

‘त्रिपाठीला संधी न देऊन बीसीसीआय त्याच्यावर अन्याय करत आहे’, असे एका चाहत्याने म्हटले आहे. तसेच ‘त्रिपाठीला संधी मिळायला पाहिजे होती’, असे म्हणत अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे. एकाने तर ‘वय झालेल्या शिखर धवनला खेळवण्याऐवजी ऋतुराज गायकवाड किंवा राहुल त्रिपाठी भारतीय संघात जागा मिळण्याचे हक्कदार आहेत’, असे म्हटले आहे.

https://twitter.com/Ashutos23472034/status/1560160034369048577?s=20&t=a7bSY6e4sE_NRrOy5izHtA

https://twitter.com/nitingupta_03/status/1560157966392631297?s=20&t=YFGwuvMOLY9LcOveJ04d7A

https://twitter.com/i_Ashokyaadav/status/1560159742072586241?s=20&t=B9VVihl4cjJrixOBN-1HTw

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन-
शिखर धवन, शुबमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

चेतेश्वर पुजाराची स्फोटक फलंदाजी सुरूच! दोन शतकांनतंर पुन्हा एकदा केली उल्लेखनीय खेळी

INDvsZIM: नाणेफेकीत राहुलची बाजी, दीर्घ काळानंतर भारतीय संघात ‘या’ खेळाडूचे पुनरागमन

‘मी कोण आहे, त्याच्याशी माझी तुलना करणारा’, धोनीबद्दल केएल राहुलची हृदयास भिडणारी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---