भारतीय कसोटी संघाची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराचे एक अनोखेच रूप इंग्लंडमध्ये पाहायला मिळत आहे. तो सध्या रॉयल लंडन वनडे स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत तो काउंट संघ ससेक्सचे नेतृत्व करत आहे. त्याने सलग तिसऱ्या सामन्यात ५०च्या जवळपास धावा केल्या आहेत. ससेक्स विरुद्ध डरहम (SussvsDurh) सामन्यात त्याने नाबाद ४९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला आहे. हा सामना ससेक्सने ४ चेंडू आणि ४ विकेट्स शिल्लक राखत जिंकला आहे.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने या सामन्यात ६८ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. यामध्ये त्याने २ चौकार फटकारले. जेव्हा ससेक्सचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांनी २५.१ षटकात २ बाद १२३ धावा केल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या ५ बाद १८४ झाली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराने संथ पण महत्वाची खेळी करत संघाला जिंकण्यासाठी अशक्य असणारा सामना जिंकून दिला.
या सामन्यात डरहमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी ५० षटकात ८ विकेट्स गमावत २२८ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर ग्राहम क्लार्क याने सर्वाधिक अशा ६९ धावा केल्या. तर जेम्स कोल्सने ३ विकेट्स घेतल्या.
पुजाराचा इंग्लंडमधील धडाका कायम
पुजारा या उजव्या हाताच्या ३४ वर्षीय फलंदाजाने १४ ऑगस्टलाच सरे विरुद्ध १७४ धावा केल्या होत्या. ही त्याच्या लिस्ट एमधील सर्वोच्च खेळी ठरली होती. त्यासाठी त्याने १३१ चेंडूत १३३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने या खेळीत २० चौकार आणि ५ षटकार फटकारले. याचा अर्थ ११० धावा त्याने चेंडू सीमारेषेपार टोलवतच बनवल्या. तसेच १२ ऑगस्टला वॉर्विरशायच्या विरुद्ध १०७ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने एका षटकात २२ धावा केल्या होत्या.
पुजाराचे भारताकडून वनडेतील कामगिरी
या वनडे स्पर्धेत पुजारा चमकदार खेळी करत असला तरी त्याला भारताकडून फार कमी ५० षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने भारताकडून ५ वनडे सामने खेळले आहेत. तर शेवटचा वनडे सामना २०१४मध्ये खेळला. तसेच त्याने १०९ लिस्ट ए च्या सामन्यात ५६.५२च्या सरासरीने ४८६१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १३ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsZIM: नाणेफेकीत राहुलची बाजी, दीर्घ काळानंतर भारतीय संघात ‘या’ खेळाडूचे पुनरागमन
‘मी आणि शेन वॉर्न एकमेकांना डेट करत होतो’, ऑस्ट्रेलियन पॉर्न स्टारच्या खुलास्याने खळबळ
‘मी कोण आहे, त्याच्याशी माझी तुलना करणारा’, धोनीबद्दल केएल राहुलची हृदयास भिडणारी प्रतिक्रिया