---Advertisement---

‘मी आणि शेन वॉर्न एकमेकांना डेट करत होतो’, ऑस्ट्रेलियन पॉर्न स्टारच्या खुलास्याने खळबळ

On: गुरूवार, ऑगस्ट 18, 2022 12:09 PM
Shane-Warne-Gina-Stewert
---Advertisement---

काही महिन्यांपूर्वी अकनाक निधन झालेला ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज शेन वॉर्न हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता ऑस्ट्रेलियाची ‘ओन्ली फॅन्स’ स्टार जीना स्टीवर्ट हिने वॉर्नबद्दल खळबळजनक दावा केल्यामुळे पुन्हा एकदा दिवंगत क्रिकेटपटू वॉर्न चर्चेत आला आहे. आपण वॉर्नसोबत एका गुप्त नात्यात असल्याचे अडल्ट स्टार स्टीवर्टने म्हटले आहे. तसेच वॉर्नच्या निधनापूर्वी आपण त्याच्यासोबत नियमित संपर्कात असल्याचेही तिने म्हटले आहे. 

वॉर्नला (Shane Warne) ४ मार्च रोजी थायलँडच्या कोह सामुई बेटावर हृदयविकाराचा झटका आला होता. तो तिथे मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. तसेच तो मृत्यूपूर्वी वजन कमी करण्यासाठी कडक डाएटवरही होता. वॉर्नच्या अशा जाण्याने स्वतला जगातील सर्वात हॉट ग्रँडमा म्हणवणारी स्टीवर्ट (Gina Stewert) खूप दु:खी आहे.

डेली स्टारशी बोलताना स्टीवर्ट म्हणाली की, “मी गेल्या काही महिन्यांपासून खूप हैरान आहे. जगाने एका महान खेळाडूला गमावले आहे. मी एका जवळच्या मित्र आणि विश्वासपात्र व्यक्तीला गमावले आहे. हे खूप अकाल्पनिक होते. मी शेनला डेट करत होते. त्याला आमच्यातील संबंध खाजगी ठेवायचे होते.”

पुढे बोलताना स्टीवर्टने वॉर्नसोबतच्या आपल्या पहिल्या मुलाखतीचा किस्सा सांगितला. आपली वॉर्नसोबत पहिली बातचित २०१८ मध्ये झाली असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर एकमेकांना मॅसेजद्वारे बोलल्यानंतर अखेर गोल्ड कोस्टमध्ये आपण प्रत्यक्षात एकमेकांना भेटलो असल्याचा उलगडा तिने केला आहे.

https://www.instagram.com/p/COIk_ETp7GB/?utm_source=ig_web_copy_link

स्टीवर्ट म्हणाली की, “वॉर्न गोल्ड कोस्टला आला होता. तिथे एका क्रिकेट सामन्यानंतर मी त्याला भेटले होते. आम्ही त्या दिवशीची पूर्ण रात्र एकमेकांना जाणून घेण्यात आणि बोलण्यात घालवली होती. मला तो खूप रोमांचक व्यक्ती वाटला. मला त्याच्या जीवनाबद्दल ऐकायला चांगले वाटले. आम्ही थोड्या दिवसातच खूप जवळ आलो होतो. मी वॉर्नला वचनही दिले होते की, आमचे संबंध लोकांच्या नजरेपासून दूर ठेवेल. शेन मीडियाशी खूप चिडला होता. त्याची अशी इच्छा नव्हती की, आमच्यातले नाते बाहेर जावे. त्याचसाठी त्याने मला सर्वकाही गोपनीय ठेवायला सांगितले होते.”

“ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मी आमच्या नात्याबद्दल सार्वजनिक रूपाने बोलत आहे. मी नेहमीच त्याच्या इच्छांचे पालन केले आहे आणि माझ्या गोष्टींना खाजगी ठेवले आहे. मी आतापर्यंत याबद्दल बोलू शकत नव्हते. पण आता माझी इच्छा आहे की, सर्वांना हे माहिती पडावे वॉर्न वास्तवात खूप काळजी घेणारा मानवतावादी मनुष्य होता. त्याने खूप चांगली कामे केली आहेत. तो एक लिजेंड होता. तो एक असा व्यक्ती होता, ज्याच्यावर नेहमीच त्याच्या मुलांना अभिमान असेल”, असेही स्टीवर्ट म्हणाली.

शेवटी स्टीवर्टने असाही उलगडा केला की, वॉर्न थायलँडला जाण्यापूर्वी तिचे त्याच्याशी बोलणे झाले होते. “मी शेन थायलँडला जाण्यापूर्वी त्याच्याशी संपर्कात होते. तो एक चांगला श्रोता होता. त्याने नेहमीच मला मी त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून दिली होती. त्याने मला सांगितले होते की, त्याला माझ्यासोबत इतके सहज वाटायचे जणू तो वर्षानुवर्षे माझ्याशी बोलत आहे”, असे तिने पुढे म्हटले.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बुमराहची अनुपस्थिती झिम्बाब्वेसाठी फायद्याची; धाकड खेळाडू म्हणतोय, ‘आता आमच्यासाठी…’

‘मी कोण आहे, त्याच्याशी माझी तुलना करणारा’, धोनीबद्दल केएल राहुलची हृदयास भिडणारी प्रतिक्रिया

झिम्बाब्वे दौरा जिंकण्यासाठी राहुलकडे आहेत ‘हे’ ३ हुकमी एक्के! कोणत्याही क्षणी निकाल बदलण्यात पटाईत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---