भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. जेव्हा भारतीय संघ एखादा क्रिकेट सामना पराभूत होतो, तेव्हा चाहते खेळाडूंसह शास्त्री यांच्या डोक्यावर संघाच्या पराभवाचे खापर फोडताना दिसतात. बऱ्याचदा या गोष्टीवरुन त्यांना ट्रोल केले जाते. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले तर, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड कसोटीत लज्जास्पद पराभव मिळवला होता. त्यानंतर चाहत्यांनी शास्त्रींवर निशाणा साधला होता. परंतु आता चाहत्यांनी स्वत: शास्त्री यांची क्षमा मागितली आहे.
का मागितली चाहत्यांनी शास्त्रींची क्षमा ?
झाले असे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर- गावसकर मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेत आपले पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने उत्तम कामगिरी केली. या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत असताना शास्त्री यांनीदेखील सिराजची स्तुती करत त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शोध घोषित केले.
त्यांनी भारतात आल्यानंतर आपल्या सोशल मीडियावरील ट्विटर अकाऊंटवरून सिराजच्या बाबतीत एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी लिहले होते की, “गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी ज्या प्रकारे मोहम्मद सिराजने निभावली, त्या अनुषंगाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला लागलेला शोध आहे. सिराजने आपल्या वडिलांना गमावले, वर्णभेदावरुन टीका सहन केल्या. हे सर्व झाल्यानंतर ही तो भारतीय संघाचा दुवा म्हणून सोबत राहिला.”
ऑस्ट्रेलिया येथील मालिका विजयात खेळाडूंबरोबर शास्त्रींचाही तेवढाच वाटा आहे. ऍडलेड कसोटीतील पराभवानंतर संघाला धीर देण्याचे, त्यांना एकत्र आणण्याचे काम शास्त्री यांनी केले. सोबतच ते संघातील खेळाडूंचे कौतुक करण्यातही मागे पडले नाहीत. यामुळे शास्त्री यांच्या ट्विटवर क्रिकेट चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच शास्त्री यांना मागील काळात ट्रोल केल्याबद्दल त्यांची माफी देखील मागितली आहे.
Find of the tour for shoring up the bowling attack the way he did – Mohd Siraj. He fought through personal loss, racial remarks and channelised them to find home in the team huddle 🇮🇳 pic.twitter.com/qkzpXgqQiX
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 22, 2021
It is the time to appreciate this man Ravi Shastri. All of us trolled him every time.
He deserves respect.— Archit (@Cyber_Altruist) January 22, 2021
https://twitter.com/Frozen_viratian/status/1352551526766694401?s=20
Ravi honestly I have not been a fan of your position as the coach . But your statement of “ keep 36 as a badge of honour on your sleeve “ and the statement that followed where you tell will make u achieve history is just amazing .. well done
— jaisimha rangaraj (@jaisimhar) January 22, 2021
Thank you coach for keeping our team United and that fighting spirit. Captain of the ship. pic.twitter.com/0W0heCQyCL
— manali💕 (@crick_fanatic05) January 22, 2021
मोहम्मद सिराजची कसोटी मालिकेतील कामगिरी
मोहम्मद सिराजने मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यापासूनच सिराजने उत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थित सिराज हा भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. ब्रिस्बेन येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात एका डावात सिराजने 5 बळी घेण्याचा कारनामा केला. सिराजने या सामन्यात 150 धावा देत 6 गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! मोहम्मद सिराजने स्वतःलाच गिफ्ट केली महागडी कार; पाहा फोटो
“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा