---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी नेट बॉलर म्हणून निवड झालेला ‘हा’ पठ्ठ्या आहे तरी कोण? धोनीशी आहे खास नातं..

On: शनिवार, जानेवारी 23, 2021 3:04 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळली गेली. या तीन ही मालिकेसाठी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन हा भारतीय संघाचा नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघात सहभागी झाला होता. त्यांनंतर भारतीय संघातील खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे नटराजनने भारतीय संघात पदार्पण केले.

त्याचबरोबर त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले. आता त्याचप्रमाणे सौरभ कुमार हा नटराजन प्रमाणे भारतीय संघाचा नेट गोलंदाज म्हणून सहभागी झाला आहे. उत्तरप्रदेशचा 26 वर्षीय गोलंदाज सौरभ कुमारला, भारत आणि इंग्लंड संघात होणार्‍या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान दिले आहे.

कोण आहे सौरभ कुमार?

भारत आणि इंग्लंड संघात चार कसोटी सामन्याची मालिका खेळली जाणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर 5 नेट गोलंदाज आणि तेवढेच राखीव खेळाडू म्हणून सुद्धा निवड केली आहे. या पाच नेट गोलंदाजामध्ये सौरभ कुमारचा सुद्धा समावेश आहे. सौरभ कुमार हा 27 वर्षीय फिरकी गोलंदाज गोलंदाज आहे.

देशांतर्गत खेळल्या गेलेल्या क्रिकेटमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची भारतीय संघाच्या नेट गोलंदाजामध्ये निवड करण्यात आली आहे. त्याने 2015 साली पदार्पण केले होते. सौरभ कुमारने 44 प्रथम श्रेणी सामने खेळताना 192 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची इकॉनॉमी फक्त 2.70 ची आहे. इतकेच नाही तर, त्याने 16 वेळा एका डावात 5 विकेट्स आणि 6 वेळा एका सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेत धोनीच्या संघाचा होता भाग

सौरभ कुमारला 2017 मध्ये राइजिंग पुणे सुपरजायंटस फ्रेंचायजीने खरेदी केले होते. त्याला 10 लाख रूपये देउन खरेदी केले होते. परंतु त्याने अजून पर्यंत आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले नाही. त्याने मर्यादित षटकांच्या प्रथम श्रेणीचे 26 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 28 टी-20 सामने खेळताना 21 विकेट्स मिळवल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने रणजी मध्ये 10 सामने खेळताना 51 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने हरियाणा विरुद्ध खेळताना एका सामन्यात 14 विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला आहे. गोलंदाजी प्रमाणे त्याने फलंदाजी करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन शतके सुद्धा ठोकली आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन

ऑस्ट्रेलिया भूमीवरील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा खुश! युवा पदार्पणवीरांना देणार ही महागडी भेट

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---