---Advertisement---

पाकिस्तानी सौंदर्यवतीने भारतीयांनाही लावलं याड, झालं असं काही की होऊ लागली अनुष्काशी तुलना

On: शुक्रवार, मे 7, 2021 4:09 PM
---Advertisement---

सोशल मीडिया हे एकमेकांसोबत संवाद साधण्याचं साधन आहे. तसेच याच माध्यमावर एखादा गोष्टीवरून चर्चा रंगणे काही नवीन गोष्ट नाही. इथे कोणत्याही क्रिकेटपटू किंवा सेलिब्रिटीची तुलना एकमेकांसोबत करून चर्चा केली जाते. नुकताच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा कोविड-१९ समर्थन चळवळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच ती आणखी एका कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री ऐमन सलीम हीची तुलना भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत केली जात आहे. तर आश्चर्याची बाब ही आहे की, भारतीय चाहते अनुष्का शर्मावर नव्हे तर ऐमन सलीमवर फिदा होताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि ऐमन सलीम यांचे फोटोज् खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघींपैकी सर्वात सुंदर कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.

दोघीही दिसायला खुप सुदंर आहेत. त्यामुळे चाहते ही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना वाटते की, ऐमन सलीम अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तर काहींना वाटते की दोघीही सारख्याच दिसतात.

अचानक वाढले फॉलोवर्स
ऐमन सलीमबद्दल सांगायचं झालं तर ती, पाकिस्तानी ड्रामा सिरीज ‘चूपके चूपके’मध्ये काम केल्यानंतर चर्चेत आली होती. ही ड्रामा सिरीज भारतातही खूप प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे भारतातून देखील अनेक चाहते तिला फॉलो करू लागले आहेत. आता ती भारतात आणि पाकिस्तानमध्ये इतकी प्रसिद्ध झाली आहे की, तिची तुलना चक्क अनुष्का शर्मासोबत केली जाऊ लागली आहे.

https://twitter.com/sidk24/status/1390401923795324930?s=20

भारतीय नागरिक म्हणतात ऐमन सलीम अधिक सुंदर
भारत आणि पाकिस्तान, या दोन्ही देशांतील लोकांमध्ये सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीवरून जोरदार चर्चा होणे काही नवीन नाहीये. परंतु या चर्चेत देखील अनेक लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने ऐमनला वास्तविक सौंदर्य असल्याचे म्हटले तर दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘मी भारतातून आहे परंतु मला ऐमन खूप आवडते.’ तर काही युजर्स अनुष्का शर्मा जास्त सुंदर असल्याचे म्हणत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काही दिवसांपूर्वी आर्चरच्या हातात घुसला होता काचेचा तुकडा, आता करतोय तुफानी फटकेबाजी, पाहा व्हिडिओ

‘आले.. आर्याचे बाबा आले,’ आयपीएल वारीनंतर अजिंक्य रहाणे पोहोचला घरी; पत्नीने अशी दिली माहिती

रैनाची एक बाजू अशीही!! ‘मिस्टर आयपीएल’ बनला कूक, व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---