---Advertisement---

‘थाला’ला पाहण्यासाठी काहीही! हैदराबादमध्ये चाहत्यांनी तोडले स्टेडियमचे बॅरिकेड्स, पोलिसांकडून कारवाई

---Advertisement---

आयपीएलचा हा हंगाम महेंद्रसिंह धोनीचा अखेरचा हंगाम असू शकतो. त्यामुळे चाहते धोनीला खेळताना पाहण्यासाठी अक्षरश: वेडे झाले आहेत. 42 वर्षांचा धोनी कुठेही गेला तरी चाहते त्याला पाहण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत.

5 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. हा सामना सुरू होण्यापूर्वी धोनीच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचे काही व्हिडिओ आता समोर आले आहेत. हैदराबादच्या स्टेडियमध्ये प्रवेश करण्यासाठी थालाच्या चाहत्यांनी चक्क बॅरिकेड्सच तोडले. त्यानंतर पोलिसांनी कशीबशी परिस्थिती नियंत्रणात आणली.

झालं असं की, वैध आयपीएल तिकिटे असूनही चाहत्यांना प्रवेश दिला जात नसल्यानं उप्पल स्टेडियमबाहेर तणाव पसरला होता. वैतागलेल्या चाहत्यांनी गेट क्रमांक 4 जवळील बॅरिकेड्स तोडल्यानं परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली होती. यानंतर पोलीस आणि चाहत्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धोनी पुन्हा एकदा डावाच्या अखेरीस फलंदाजीला आला. त्यानं फक्त दोन चेंडू खेळून 1 धाव काढली. मात्र जेव्हा त्यानं मैदानावर प्रवेश केला तेव्हा चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. अखेरच्या षटकात डॅरिल मिचेल बाद झाल्यानंतर धोनी मैदानावर आला, ज्यानंतर चाहत्यांनी अख्ख मैदानच डोक्यावर घेतलं होतं!

 

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 165 धावा केल्या. हैदराबादनं 166 धावांचं लक्ष्य, एडन मार्करमचं अर्धशतक आणि सलामीवीर अभिषेक शर्माच्या 12 चेंडूत 37 धावांच्या स्फोटक खेळीच्या 4 गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठलं.

या विजयासह हैदराबादनं गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. त्यांचे 4 सामन्यात 2 विजयासह 4 गुण आहेत. दुसरीकडे, सलग दोन पराभवानंतर चेन्नईची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नईचेही 4 सामन्यात दोन विजयांसह 4 गुण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

गोळ्या झाडल्या, दगडं उचलले!…पाकिस्तानचा संघ क्रिकेट खेळण्याची तयारी करतोय की युद्धाची? पाहा VIDEO

IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोणते? टॉप-५ मध्ये दोन अनकॅप्ड भारतीय

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अभिषेक शर्माची एंट्री, पर्पल कॅपवर मोहित शर्माचा ताबा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---