---Advertisement---

गोळ्या झाडल्या, दगडं उचलले!…पाकिस्तानचा संघ क्रिकेट खेळण्याची तयारी करतोय की युद्धाची? पाहा VIDEO

---Advertisement---

टी 20 विश्वचषक 2024 जवळ येत आहे. त्याआधी पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडसोबत 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळायची आहे. यासाठी सध्या पाकिस्तानची टीम अबोटाबादमध्ये फिटनेस ट्रेनिंग करत आहे, जी ट्रेनिंग आता चर्चेचा विषय बनली आहे.

पाकिस्तान संघाच्या ट्रेनिंगचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे खेळाडू रस्सीखेच, दगड वाहून नेणे, पर्वतावर चढणे आणि बंदुकीतून गोळीबार करणे अशा प्रकारची ट्रेनिंग करताना दिसतायेत. अशा प्रकारचं प्रशिक्षण पाहून क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अशा प्रशिक्षणाचे फायदे काय आहेत याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. मात्र हे प्रशिक्षण शिबिर सोशल मीडियावर मोठ्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. व्हिडिओमध्ये नसीम शाह, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांसारखे पाकिस्तानी खेळाडू ट्रेनिंग करताना दिसत आहेत.

वास्तविक, पाकिस्तानची क्रिकेट टीम सैन्याकडून प्रशिक्षण घेत आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ क्रिकेट खेळण्याची की युद्धाची तयारी करत आहे, असे प्रश्न लोक विचारू लागले आहेत. पाकिस्तानच्या मीडियानंही अशा प्रशिक्षणाचा क्रिकेट कौशल्याशी संबंध काय, असे प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या प्रशिक्षणामुळे खेळाडूंना मानसिक बळ मिळेल, तसेच त्यांच्या शरीरात लवचिकता येईल आणि त्यांना संघ म्हणून एकत्र काम करण्यास मदत होईल, असं सोशल मीडियावरील काही चाहत्यांनी म्हटलं आहे.

 

 

टी 20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये हालचालींना वेग आला आहे. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं शाहीन आफ्रिदीला टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवून माजी कर्णधार बाबर आझमला पुन्हा कर्णधार बनवलं. 2024 च्या टी 20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका होणार आहे. ही मालिका 18 एप्रिलपासून सुरू होणार असून ती 27 एप्रिलपर्यंत चालेल. आता पाकिस्तानच्या या आर्मी स्टाईल प्रशिक्षणाचा संघाला किती फायदा होतो, हे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा निकालच सांगेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अभिषेक शर्माची एंट्री, पर्पल कॅपवर मोहित शर्माचा ताबा

IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोणते? टॉप-५ मध्ये दोन अनकॅप्ड भारतीय

मोठी बातमी! दरोडेखोरांच्या हल्ल्यात जगप्रसिद्ध फुटबॉलपटूची हत्या, गोळ्या घालून केले ठार । Luke Fleurs

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---