क्रीडा विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध फुटबाॅलपटू, ऑलिंपिकवीर ल्यूक फ्लूर्स ( Luke Fleurs ) याची हत्या करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार दरोडेखोरांसोबत झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केल्याचे समजते. ( South African footballer and Olympian Luke Fleurs killed in hijacking )
दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू आणि ऑलिम्पियन ल्यूक फ्लूर्स याची दरोड्याच्या घटनेत हत्या करण्यात आली. ल्यूकचा क्लब काइजेर चीफ्स यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. 24 वर्षीय बचावपटू ल्यू हा हनीड्यू परिसरात पेट्रोल पंपावर रांगेत उभा असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. फ्लूर्स टोकयो ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा सदस्य होता.
‘ल्यूक फ्लूर्सची जोहान्सबर्गमध्ये दरोड्याच्या घटनेत बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसाठी सहवेदना व्यक्त करतो.’ असे क्लबकडून सांगण्यात आले.
‘हल्लेखोर ल्यूकची कार घेऊन फरार झाले आहेत. पोलिस कारची लूट आणि हत्याप्रकरणी तपास करत आहेत’ असे पोलिसांनी सांगितले.
अधिक वाचा –
– अवघ्या 12 चेंडूत केलं काम तमाम! अभिषेक शर्मानं फोडून काढली चेन्नईची गोलंदाजी
– मुंबई इंडियन्सच्या करोडो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! संघाचा तारणहार पुन्हा परतणार, सुर्याच्या कमबॅकचा दिवस ठरला?
– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ