---Advertisement---

मुंबई इंडियन्सच्या करोडो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! संघाचा तारणहार पुन्हा परतणार, सुर्याच्या कमबॅकचा दिवस ठरला?

Suryakumar-Yadav-Record
---Advertisement---

आयपीएल 2024 मध्ये सध्या पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी एक दिलासा देणारी आणि संघाच्या करोडो चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कणा असलेला आणि संघाचा तारणहार असणारा सुर्या अर्थात सुर्यकुमार यादव संघात लवकरच परतणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. सूर्यकुमार यादवने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्तीच्या चाचणीत जवळपास सर्व निकष पूर्ण केले असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. याचा अर्थ आता काही दिवसात सुर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून मैदानावर खेळताना दिसू शकतो. ( SURYAKUMAR YADAV TO JOIN THE MUMBAI INDIANS EARLY FOR IPL 2024 )

बुधवारी (दि. 3 एप्रिल) रोजी याबाबत माहिती समोर आली होती. ज्यात बुधवारी सूर्यकुमार यादवची आणखी एक चाचणी झाली होती. त्यामध्ये सूर्यकुमार यादव पुर्णपणे तंदुरुस्त असून तो लगेचच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे समजले. त्यामुळे कदाचित परवा अर्थात 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसू शकतो. पराभवाच्या गर्ते अडकलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी ही खुप मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे. जागतिक टी20 क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवे त्याचा अखेरचा टी20 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळला होता.

मुंबई इंडियन्स संघाला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सूर्यकुमार यादव सारखा भरवशाचा आणि अनुभवी खेळाडू संघात परतल्यानंतर कदाचित पराभवाचे हे मळभ संघावरून दूर होऊ शकतं. त्यामुळे मुंबईचा मिस्टर 360 अशी ओळख असलेला सुर्या संघात परतल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना जिंकून विजयाचं खातं उघडणार का, हे पाहावे लागेल.

सूर्यकुमारची आयपीएलमधील कारकीर्द-
सूर्यकुमारने त्याच्या IPL कारकिर्दीत आतापर्यंत 139 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 124 डावांमध्ये 31.85 च्या सरासरीने आणि 143.32 च्या स्ट्राइक रेटने त्याने 3249 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 1 शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. 103 ही सुर्यकुमारची आयपीएलमधली सर्वोच्च धावसंख्या आहे.

अधिक वाचा –
– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ
– IPL 2024 GT vs PBKS : टॉस जिंकून पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात घातक खेळाडूंची एन्ट्री, पाहा प्लेइंग इलेव्हन

– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---