अहमदाबाद। भारताने इंग्लंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारताचा फिरकीपटू आर अश्विनसाठी खास ठरला आहे.
अश्विनने या सामन्यादरम्यान त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४०० विकेट्सचा टप्पा पार केला. त्याने इंग्लंडचा दुसरा डाव सुरु असताना २४ व्या षटकात आर्चरची घेतलेली विकेट घेतली. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील ४०० वी विकेट ठरली. ही विकेट घेतल्यानंतर अश्विनने चेंडू हातात घेतला आणि तो हात उंचावत अभिवादन केले होते. यावेळी भारतीय संघानेही अश्विनच्या या विकेटचे जोरदार सेलिब्रेशन केले. तो ४०० कसोटी विकेट्स घेणारा भारताचा चौथा गोलंदाज ठरला.
चाहत्यांनीही केले सेलिब्रेशन –
दरम्यान, अश्विनने ४०० वी विकेट्स घेताच प्रेक्षकांनीही जोरदार सेलिब्रेशन केले. प्रेक्षकांच्या सेलिब्रेशनचाही एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात अश्विनने विकेट घेताच प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जल्लोष केल्याचे दिसत आहे.
Recorded Ashwin's 400th Test Wicket live from the stadium 🏟️😍
What a player 💙#INDvsENG #ashwin400 pic.twitter.com/cWNzktwjEs— fcbsagarrrr• (@fcbsagar45) February 25, 2021
Special bowler
Special milestone
Special emotionsTake a bow, @ashwinravi99! 👏👏@Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the match 👉 https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/HkxrEiTFpo
— BCCI (@BCCI) February 25, 2021
प्रेक्षकांना दिली होती स्टेडियममध्ये येण्याची परवानगी
कोरोनाच्या धोक्यामुळे सध्या अनेक क्रीडा स्पर्धा बंद दारामागे होत आहेत. पण अहमदाबादला झालेल्या सामन्यासाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली होती.
सर्वात जलद ४०० कसोटी विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज
अश्विनने ४०० कसोटी विकेट्सचा हा टप्पा ७७व्या कसोटी सामन्यात गाठला. यासह जलद गतीने ४०० बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने अवघ्या ७२ सामन्यातच हा टप्पा गाठला होता. अश्विनपूर्वी रिचर्ड हॅडली आणि डेल स्टेन यांनी ८० कसोटी सामन्यात ४०० बळी घेतल्याने ते याआधी दुसऱ्या स्थानावर होते. मात्र आता अश्विनने त्यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६०० विकेट्स पूर्ण
याच सामन्यादरम्यान, अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत स्टोक्सला बाद करत ६०० विकेट्स घेण्याचा कारनामाही केला. तो ६०० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा ५ वा भारतीय ठरला आहे. त्याच्यापूर्वी अनिल कुंबळे (९५६), हरभजन सिंग (७११), कपिल देव (६८७) आणि जहिर खान (६१०) यांनी हा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मेरे पैसे दो”, रिषभने भर मैदानात पंचांकडे केली मागणी; व्हिडिओ होतोय व्हायरल
पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर हिमा दास झाली भावूक; म्हणाली, ‘माझे एक मोठे स्वप्न…’
खरंच अहमदाबाद कसोटीची खेळपट्टी होती खराब? जाणून घ्या काय आहेत आयसीसीचे नियम