विश्वचषक 2023 मधील 20 वा सामना शनिवारी (21 ऑक्टोबर) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा 229 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्याचवेळी, या सामन्यादरम्यान चाहत्यांनी अचानक क्रिकेटचा देव मानला जाणारा भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली.
https://twitter.com/TCM_MEMES/status/1715938778790199593?t=OQUuQsyhzbnr7RjzvmMSig&s=19
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेला सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेले चाहते सचिनच्या नावाने घोषणाबाजी करताना दिसत आहेत. सामन्यादरम्यान संपूर्ण स्टेडियम सचिनच्या नावाने गुंजले. खुद्द सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा बॅट घेऊन मैदानात उतरला की काय अशी परिस्थिती होती. सचिनच्या नावाच्या या घोषणांचा व्हिडिओ चाहत्यांनाही आवडला आहे. निवृत्तीच्या इतक्या वर्षानंतरही मास्टर ब्लास्टरची क्रेझ अजूनही कायम आहे, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजू शकते.
खरे तर वानखेडे स्टेडियम हे सचिन तेंडुलकरचे होम ग्राउंड आहे. आपल्या क्रिकेट प्रवासात त्याने या मैदानावर अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामनाही याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. वानखेडे येथे त्यांच्या नावाचे स्टँडही आहे.
आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांना आपल्या कारकिर्दीत घाम फोडणारा सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. त्याने आंतराष्ट्रीय कारकिर्दीत 100 शतकेही झळकावली आहेत. निवृत्तीनंतर सचिन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो दररोज त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
(Fans Chanting Sachin Sachin In Wankhede Stadium In England v South Africa Match)
हेही वाचा-
क्या बात है! अवघ्या 9 धावांवर न्यूझीलंडला बसला पहिला धक्का, सिराजने ‘असा’ काढला कॉनवेचा काटा
IND vs NZ Toss: महत्त्वाच्या सामन्यात रोहितने जिंकली नाणेफेक, पंड्यासह ‘या’ खेळाडूला केलं संघाबाहेर