आयपीएलची क्रेझ आपल्या सर्वांना माहीत आहे. या लीगची क्रेझ एवढी आहे की अनेक वेळा भारतीय प्रेक्षकांनी आयपीएलमुळे विशिष्ट संघासाठी किंवा मैदानावर परदेशी खेळाडूसाठी त्याच्या नावाचा नारा दिला आहे. आयपीएल२०२२ ची २९ मे रोजी सांगता झाली पण चाहते अजूनही त्याच माहोल मध्ये आहेत. त्यामुळेच शुक्रवारी राजकोटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी२० दरम्यान सीएसके-सीएसके चा नारा लावण्यात आला.
चेन्नई सुपर किंग्ज ही आयपीएलची सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मानली जाते. या संघाच्या चाहत्यांच्या मागे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाचा कर्णधार एमएस धोनी. धोनीची लोकप्रियता कोणत्याही विशिष्ट स्टेडियम किंवा ठिकाणापुरती मर्यादित नाही. याच कारणामुळे त्याचा संघ जिथेही खेळतो तिथे त्याला चाहत्यांचा पाठिंबा मिळतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/myself_deena/status/1537817176106684416
चेन्नई सुपर किंग्जच्या ट्वीटर अकाऊंटवरून देखील या व्हिडिओला प्रतिसाद देत, “खरंच राजकोटवर सीएसके-सीएसके ऐकू येत आहे का?” असा सवाल विचारण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओवर अनेक चेन्नईच्या चाहत्यांनी आपले प्रेम दाखवत प्रतिसाद दिला आहे.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1537814279209906176
दरम्यान, चौथ्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णयही योग्य ठरला आणि १३ षटकांत ८१ धावा होईपर्यंत भारताने चार विकेट गमावल्या होत्या. येथून हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांनी तुफानी फलंदाजी केली. पंड्या ३१ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला, तर कार्तिकने आपले पहिले टी२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले आणि २७ चेंडूत ५५ धावा केल्या. अशाप्रकारे संघाने २० षटकांत सहा गडी गमावून १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ ८७ धावांत गारद झाला. दोन्ही संघांमधील निर्णायक सामना १९ जून रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रियल पुणे युनायटेड ‘अ’, गनर्स फुटबॉल क्लब यांचा एकतर्फी विजय
दोन भारतीय दिग्गजांमध्ये वाद अन् कारण ठरतोय दिनेश कार्तिक, वाचा काय आहे प्रकरण
कार्तिकवर खुद्द आफ्रिकी गोलंदाजही फिदा, म्हणाला ‘तो’ सध्याचा सर्वोत्तम फिनिशर





