---Advertisement---

अरे असा कसा खेळतोय हा! स्टीव स्मिथचा हा शॉट पाहून प्रेक्षक झाले लोटपोट, तुम्हीच बघा आता

On: गुरूवार, नोव्हेंबर 24, 2022 12:52 AM
Steve Smith unusual shot
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर तब्बल 221 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड आणि डेविड वॉर्नर या दोघांनी झंझावती शतके झळकावली. मात्र, या सामन्यात स्टीव स्मिथ याचा एक शॉट बघून सगळेच लोटपोट झाले आणि या शॉटची तुलना थेट रॉजर फेडरर याच्याशी केली जात आहेे. त्याच्या या शॉटचा व्हिडीओ आता प्रचंड शेअर केला जातोय आणि यावर चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात 42व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या ख्रिस वोक्सने (Chris Woakes) एक असा चेंडू टाकला, ज्यावर स्टीव स्मिथ (Steve Smith) याने सर्वांना आश्चर्यचकीत करणारा शॉट मारला. त्याने मारलेला हा शॉट टेनिस खेळाडूच्या शैलीत मारला. त्यामुळे हा शॉट पाहिल्यानंतर चाहत्यांना राफेल नदाल (Rafael Nadal) आणि रॉजर फेडरर (Roger Federer) यांची आठवण झाली.

स्टीव स्मिथ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या एकदिवसाय सामन्यात 80 आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 94 धावा केल्या होत्या. मात्र, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो जास्त प्रभाव नाही टाकू शकला. नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषक संघाचा तो भाग होता. मात्र, तो धावा करण्यात अपयशी ठरला आणि ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकातून बाहेर पडला.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघात खेळल्या गेलेेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामना मेेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 221 धावांनी पराभव केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 48 षटकात 355 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेेलियाच्या या डावात ट्रेविस हेड (Travis Head) आणि डेविड वॉर्नर (David Warner) यांनी शतकीय खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेले 355 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली. डेविड मलान (Dawid Malan) अवघ्या 2 धावा करत तंबूत परतला आणि पूर्ण इंग्लंड संघ 142 धावांवर गारद झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुल द्रविडच्या अडचणी वाढणार! भारतीय दिग्गजाचे प्रशिक्षक बदलण्याविषयी वक्तव्य
‘खूपच शानदार पोरांनो’, निवड समिती बरखास्त झाल्यानंतर चेतन शर्मांचे ट्वीट, बीसीसीआयवर साधला निशाणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---