भारतात क्रिकेटला धर्माप्रमाणे महत्त्व दिले जाते. भारतीय क्रिकेटचे सामने पहाण्यासाठी वेळ आली तर सर्व कामे बाजूला ठेवतात. आजकाल क्रिकेट मोठ्या प्रमाणार होत असूनही चाहते तेवढ्याच आवडीने हे सामने पाहत असतात.
आता ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक जस्टिन लॅंगरनेही भारतीय चाहत्यांचं कौतूक केलं आहे.
“मला भारत देश आवडतो. मी येथे पहिल्यांदा आलो होतो तेव्हा देशाच्या प्रेमात पडलो होतो. भारतीय क्रिकेटवर खूप प्रेम करतात. ” असे ते यावेळी म्हणाले.
नॅथन काॅल्टर नाईलनेही भारतीय प्रेक्षकांची प्रशंसा केली आहे. “जर तुम्हा चांगले खेळला तर ते तुमच्यावर कौतूकाचा वर्षाव करतात, जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर ते तुम्हाला विसरतात. ते फक्त आणि फक्त क्रिकेटवर प्रेम करतात. ” असे यावेळी नॅथन काॅल्टर नाईल म्हणाला.
“प्रेक्षकांना नाराज करणं प्रचंड अवघड गोष्ट आहे. परंतु भारतात प्रेक्षक लाईनने फोटो किंवा ऑटोग्राफ घ्यायला येतात. ते खूप मोठ्या संघेने येतात. तेव्हा कुणीतरी प्रेक्षक हे सर्व न मिळाल्याने नाराज होतोच,” असे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल म्हणतो.
‘The Test: A New Era For Australia’s Team’ ही वेबसिरीज सध्या जोरदार गाजत आहे. यात ऑस्ट्रेलिया संघाची गेल्या काही वर्षातील सुधरलेली कामगिरी दाखविण्यात आली आहे. याच वेबसिरीजच्या एका भागात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय चाहत्यांसोबत भरभरुन बोलले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
–कुणी घर घेता का घर? शेन वाॅर्न विकतोय घर; किंमतही आहे तशीच
–टीम इंडियाचं कर्णधारपद रोहित- विराटमध्ये वाटून दिलं तर...
–बरोबर १३ वर्षांपुर्वी १२७किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पहा व्हीडिओ