भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना लाॅर्ड्सवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने 3 बाद 276 धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या काही धावांनी शतकाला मुकलेल्या राहुलने दुसऱ्या सामन्यात मात्र धावांची शंभरी पार केली. राहुलने केलेल्या शतकानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अगदी बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीनेही त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. यानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
मुळात गेल्या काही महिन्यांपासून राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहेत. एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे अशा बऱ्याचशा गोष्टी यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी लाॅजिस्टीक विभाकडून सर्व खेळाडूंना त्यांच्या सोबत येणाऱ्या व्यक्तिंची नावे विचारली गेली होती. खेळाडूंना त्यांची पत्नी किंवा पार्टनरचे नाव द्यायचे होते. हिदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार बीसीसीआय जेव्हा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूंच्या प्रवासाचे नियोजन करत होते; तेव्हा राहुलने त्याची अथियाला पार्टनर सांगितले होते. तेव्हापासून दोघे इंग्लंडमध्ये सोबतच आहेत. दरम्यानचे त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर दिसले आहेत.
यानंतर भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात राहुलने शतक झळकावल्यानंतर अथियाचे वडिल सुनील शेट्टींनी दिलेली प्रतिक्रिया सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून राहुलचा व्हिडियो शेयर केला आहे. त्यांनी या व्हिडीयोसोबत लिहीले आहे, ‘क्रिकेटच्या मक्कामध्ये शतक, चांगला खेळलास बाबा.’
100 at the Mecca of cricket! Well played baba 🖤 @klrahul11 pic.twitter.com/jID3GKTm7y
— Suniel Shetty (@SunielVShetty) August 12, 2021
Toh rishta pakka samjhe?
— Ayush (@Ayush08__) August 12, 2021
#KLRahul family rn pic.twitter.com/94Z0dBqEMU
— Kunnal (@iamnowayfunny) August 12, 2021
सुनील शेट्टींच्या या ट्विटनंतर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ट्विटरचे वापरकर्ते त्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हणत आहेत, ‘आता अथिया आणि राहुलचे नाते पक्के समजायचे का?’ एका वापरकर्त्यानेतर असे लिहीले की, ‘अथिया राहुलसाठी लेडी लक घेऊन आली आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्समध्ये रोहित-राहुल जोडीचे वादळ, शतकी भागिदारी करत मोडला ‘हा’ ६९ वर्षे जुना विक्रम
चेन्नईमागून मुंबईची बाजी, धोनीच्या संघाला ‘या’ गोष्टीसाठी युएई सरकारकडून नकार; वाढल्या अडचणी
युएई वारी! मुंबई इंडियन्सला मिळाली युएईला रवाना होण्याची परवानगी, ‘या’ दिवशी भरणार उड्डाण